ताज्या बातम्या

राधानगरीत एकावडे ट्रस्टतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

कुडूत्री / प्रतिनिधी

राधानगरी तहसीलदार कार्यालयामध्ये राधानगरी येथील कै. रेवताबाई एकावडे चँरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा कोल्हापूरी फेटा, शाल, बुके व मास्क वाटप करून देऊन महिलांचा जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून गौरव केला.
यावेळी पोलिस उपनिरिक्षक अनुराधा पाटील यांनी महिलांना वर्षातून एक दिवस तरी स्वतःसाठी जगण्याचा सल्ला देत नाती सांभाळताना महिला स्वतःला विसरल्या,महिलांनो स्वतःचे आरोग्य,स्वतःचे छंद आणि स्वतःला जपायला शिका असा सल्ला दिला, यावेळी कलाकार रामचंद्र चौगले यानी ट्रस्टच्या कार्याचा आढावा सादर केला.
यावेळी राधानगरीच्या तहसिलदार मिना निंबाळकर, पोलीस निरीक्षक अनुराधा पाटील, दिवाणी न्यायालय वरीष्ठ लिपीक विजया फराकटे, तहसिल कार्यालय वरिष्ठ लिपीक सारीका मिरजकर, रेखा मोळे, सुचित्रा गुरव, म. पो. अंमलदार दिपाली भांदिगरे, कर्मचारी पार्वती डोंगरे,सारीका लोखंडे, कोतवाल, सुनीता डवरी, कोमल पाटील, प्रियांका पाटील, निलम खामकर यांचा ट्रस्टचे संस्थापक प्रल्हाद एकावडे यांचे हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी
तहसिलदार मिना निंबाळकर, पुनम मर्दाने, विजया फराकटे, यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी एकावडे ट्रस्टचे प्रल्हाद एकावडे, नामदेव कुसाळे, प्रणित एकावडे उपस्थित होते.
स्वागत व प्रास्तावीक रामचंद्र चौगले यानी केले. आभार सारिका मिरजकर यानी मानले

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks