ताज्या बातम्या
शासनाने भाडेकरूंना घरे द्यावीत

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे,तालुकाप्रमुख दीलीप माने,शहरप्रमुख संतोष चीकोडे यांनी शासनाकडे भाडेकरूंना घरे मीळावीत यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून गडहिंग्लज चे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांनी घरकुल योजनेत लक्ष घालावे या मागणीचे पत्र अधिकारी शितल सुर्वे यांचेकडे शिवसेना उपशहरप्रमुख काशिनाथ गडकरी ,प्रशांत घबाडे व मान्यवरांनी दिले यावेळी शर्मीली पाटील, जयश्री कोरी, शीतल येसरे, सुनंदा केसरकर, सुनीता काळाई, पदमा गोरखा, विजयालक्ष्मी चनपटण आदी उपस्थित होते.