गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : पुलाची शिरोली विद्यार्थी आत्महत्या प्रकरण : शाळा अध्यक्ष, मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल ,उद्या शाळेवर मोर्चा

शिरोली प्रतिनिधी :

पुलाची शिरोली (ता.हातकणंगले) येथे आर्यन हेरंब बुडकर (वय 16) या विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष गणपत जनार्दन पाटील व मुख्याध्यापिका गीता गणपत पाटील यांच्यावर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

आर्यनला किरकोळ कारणावरून अपमानास्पद वागणूक, शिवीगाळ व शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिल्यामुळे त्याचे मानसिक खच्चीकरण झाले. त्यामुळे त्याने आत्महत्या केली. या आत्महत्येस गणपत पाटील व गीता पाटील हे जबाबदार आहेत, असा आरोप आर्यनचे आजोबा फिर्यादी रामचंद्र तुकाराम बुडकर यांनी केला आहे.

आर्यन हा नववीत शिकत होता.आर्यन शाळेतील हुशार विद्यार्थी होता. बुडकर कुटुंबाचा तो एकुलता मुलगा होता. शाळेमध्ये फुटबॉल खेळताना किरकोळ कारणावरून शाळेचे अध्यक्ष गणपत पाटील यांनी आर्यनला शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक देत शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली होती. यामध्ये आर्यनचे मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेमुळे शिरोली गावात प्रचंड असंतोष व तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा सोमवारी शाळेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. याप्रकरणी शाळेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा नातेवाईक व ग्रामस्थांनी शुक्रवारी दिला होता. दरम्यान, आर्यनवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

विद्यार्थी आत्महत्या : उद्या शाळेवर मोर्चा

आर्यनच्या आत्महत्येच्या निषेधार्थ सोमवारी (दि. 4) शाळेवर मोर्चा काढण्याचा इशारा कॉ. गिरीश फोंडे यांनी शिरोली ग्रामस्थ कृती समितीच्या वतीने दिला आहे. शाळेवर ठोस कारवाई न केल्यामुळे सोमवारी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत चौकातून शाळेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर पोलिस अधीक्षक, शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांनाही निवेदन देण्यात येणार असल्याचे फोंडे यांनी सांगितले.

मृतदेह काही तास लटकत होता…

आयर्नची आत्महत्या झाल्यापासून काही तास मृतदेह लटकत ठेऊन केलेला पंचनामा हा कायदाची पायमल्ली करणारे तर आहेच पण मानुसकीलाही काळीमा फासणारे ठरले आहे. असा नाराजीचा सुर नागरिकांनी व्यक्त केला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks