गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; संतप्त ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला बेदम चोपले.

भुदरगड प्रतिनिधी :

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला बेदम चोप दिला आहे .

भुदरगड तालुक्यातील लोटेवाडी येथील विद्या मंदिर लोटेवाडी या प्राथमिक शाळेतील महादेव हाळवणकर या शिक्षकाने ६ वी ची विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे.

सदर विद्यार्थिनी आरोपी शिक्षकाच्या वर्गात शिकत होती. सोमवारी अल्पवयीन मुलगी ही वर्गात आली असताना शिक्षकाने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

संबंधित शिक्षकाने केलेल्या कृत्याची माहिती पीडित मुलीने आपल्या आईवडिल व नातेवाईक यांना दिल्यानंतर शिक्षकाने उडवा उडवीची उत्तरे दिली. हा प्रकार समस्थ ग्रामस्थांना समजल्यानंतर ग्रामस्थांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना घेराव घालून जाब विचारला तर नराधाम शिक्षकाला ग्रामस्थांनी शाळेमध्ये २ तास डांबून ठेवले होते.

यानंतर ग्रामस्थांनी या नराधम शिक्षकाला चांगलाच चोप दिला. ही घटना समजताच भुदरगड पोलिसांनी या शिक्षकाला ताब्यात घेतले.त्याला गारगोटी ग्रामीण रुग्णालय मध्ये तपासणी साठी नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत भुदरगड पोलीस ठाण्यात विनयभंग व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks