ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

राजकीय पक्षांना कार्यशाळेमधून निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन; आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राजकीय पक्षांची कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी उपस्थित लोकप्रतिनीधींना निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगिक नामनिर्देशन प्रक्रिया, आदर्श आचारसंहिता, विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना, निवडणूक खर्च व्यवस्थापन, राजकीय जाहीरातींचे प्रमाणिकरण व सुविधा पोर्टल इत्यादीबाबत माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी उपस्थितांना आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, पक्ष व उमेदवारांना निवडणुकीमधील बारकावे, सर्व नियम आणि आचारसंहिता नियमावली माहित असावी या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला आदर्श आचार संहितेची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली. नामनिर्देशन प्रक्रिया उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, निवडणूक खर्च व्यवस्थापन बाबत मुख्य वित्त व लेखाधिकारी अतुल आकुर्डे, एक खिडकी योजनेबाबत अति.आयुक्त राहूल रोकडे, जाहीरात प्रमाणिकरणाबाबत जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ आणि सुविधा पोर्टल बाबतची माहिती एनआयसीचे शैलेंद्र मोटे यांनी दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे व जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनीधी उपस्थित होते.

या कार्यशाळेत विविध विषयांसाठी उपस्थित असलेल्या मार्गदर्शकांनी निवडणूकीच्या अनुषंगाने सादरीकरण करून परवानग्या, खर्च आणि नामनिर्देशन पत्राचे नमुने भरणे व सादर करण्याबाबत सादरीकरण केले. राजकीय पक्षांकडूनही यावेळी येणाऱ्या अडचणीवर सविस्तर चर्चा केली. कार्यशाळेच्या समारोपीय मनोगतावेळी जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी जिल्ह्यातील निवडणुकीच्या तयारीबाबतची माहिती उपस्थितांना दिली. ते म्हणाले, 9 सहायक मतदान केंद्रांना मंजुरी मिळाली असून एकूण 3 हजार 368 मतदान केंद्र आहेत. या सर्वच मतदान केंद्रावर किमान सुविधा पुरविण्यात येणार आहेत. जर काही ठिकाणी त्रुटी राहिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयास किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना सांगाव्यात जेणेकरून त्रुटी वेळेत दूर करता येतील. दोन्हीही मतदार संघात 5 एप्रिलपासून प्रशिक्षणास सुरुवात होते आहे. 85 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांना व दिव्यांगांना घरपोच मतदानासाठी 12 डी चे जवळपास वाटप करण्यात आले आहेत. जर, अजूनही कोणी राहिले असल्यास बीएलओ किंवा ऑनलाईन स्वरूपात सादर करावा. 12 डी फॉर्म भरून सादर करण्याची अंतिम दिनांक 17 एप्रिल 2024 आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल 2024 असून उर्वरित मतदारांनी मूदतीपूर्वी नाव नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks