ताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक

ब्रेकिंग! कोल्हापुरातील कणेरी मठावर कार्यक्रमातील शिळे अन्न खायला घातल्याने 52 गायींचा मृत्यू

कणेरी मठावर सध्या पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. अशातच ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर प्रतिनिधी : गुरुदास खराडे

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठावर मागच्या 4 दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी मोठी गोशाळा आहे. या गोशाळेत हजारो देशी गायी आहेत. यामध्ये कालचे शिळे अन्न खायला घातल्याने 52 गायी दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ इथला हा प्रकार आहे. अचानक घडलेल्या प्रकाराने खळबळ कणेरी मठावर सध्या पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. अशातच ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

याचबरोबर अनेक गायींना विषबाधा झाल्याचे समजते आहे. यातील अद्यापही 30 गायींवर उपचार सुरू आहेत.

देशी गायींच्या स्पर्धांचेही होते आयोजन

श्री सिद्धगिरी मठावर आयोजित सुमंगल सोहळ्यात देशी प्रजातींच्या गाय, म्हैस, बकरी, अश्‍व, गाढव, कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले होते. मठावर होणाऱ्या सुमंगल सोहळ्यांतर्गत 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन होईल, अशी माहिती मठाधिपती श्री काडसिद्धेश्‍वर स्वामी यांनी दिली

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks