गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्र

……अन् तिने मटका अड्ड्यावर जावून पायातले हातात घेत पतीला विचारला जाब ; पोलीस ठाण्याला आता तरी जाग येणार का ?

कळे -वार्ताहर अनिल सुतार

सध्या नवरात्रोत्सवाच्या काळात सर्वत्र स्त्रीशक्तीचा जागर सुरू असताना पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या महिलेने मटका अड्ड्यावर जात मटका बुकीसह मटक्याचा नाद लागलेल्या आपल्या नवऱ्याला चांगलाच दम भरला. या महिलेच्या दुर्गावताराने सध्या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

पश्चिम पन्हाळ्यातील बाजारपेठेचे मुख्य गाव असलेल्या कळे येथे मटका व्यवसाय सुद्धा जोरात चालतो. स्थानिकांच्या माहितीनुसार येते तब्बल 22 मटका बुकी आहेत.कळे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर मटका बुकी असून सुद्धा कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आज एका दुर्गेनं मात्र आपल्या रुद्रावतारांना मटका बुकीसह मटक्याच्या नादानं पैसे उधळणाऱ्या नवरोबाला जाब विचारत चांगलाच घाम फोडला. या महिलेचा नवरा घर खर्चासाठी पैसे मागितल्यानंतर पैसे नाहीत असे सांगून घराबाहेर पडला होता मात्र तिने नवरोबाचा पाठलाग करत पुनाळ फाटा इथला मटका अड्डा गाठला आणि तिथे दोनशे रुपयांचा मटका लावतानाच नवऱ्याला रंगेहाथ पकडले एवढ्यावरच न थांबता तिने पायातले काढून हातात घेत घर खर्चासाठी पैसे नव्हते आणि मग मटका लावायला कुठून पैसे आले अशा शब्दात जाब विचारला.एरवी निमुटपणे सगळे सहन करणाऱ्या आपल्या बायकोचा रुद्रावतार बघून या नवरोबाची बोलती बंद झाली. या महिलेने मटका घेणाऱ्याला सुद्धा चांगलं सुनावलं व त्या महिलेने अनेकांचे संसार उध्वस्त करणारा मटका व्यवसाय बंद करण्याची मागणी केली आहे.

या घटनेची चर्चा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली आणि मग पोलीस यंत्रणेला जाग येऊन पोलिसांनी बाजारभोगाव ता. पन्हाळा येथील बसस्थानक परिसरातील वैभव भगवान पाटील व शामराव लक्ष्मण पोवार रा.करंजफेन ता.शाहुवाडी (फरारी) या दोघांवर कारवाई करून त्यांच्याकडील तीन हजार रुपये व मटक्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले.

कळे पोलीस ठाण्याला आता तरी जाग येणार का ?
एका महिलेने रुद्रावतार धारण करत मटका व्यवसाय विरोधात चप्पल हातात घेईपर्यंत कळे पोलिसांना आपल्या हद्दीत मटका व्यवसाय सुरू आहे हे माहित नव्हतं का ? असा प्रश्न लोकांमधून उपस्थित होत आहे. पोलिसांना खरंच मटक्यामुळे उध्वस्त होणारे संसार वाचवायचे असतील तर त्यांनी लोकांच्या समाधानासाठी एका दुसऱ्या मटका बुकीवर कारवाई करून न थांबता कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मटका व्यवसाय पूर्णपणे बंद करणे गरजेचे आहे. या नवरात्र उत्सव काळात कळे पोलीस मटका व्यवसायाच्या विरोधात कारवाई करत या महिलेसह सर्वच महिलांचा सन्मान करतील अशी अपेक्षा जाणकारांतून व्यक्त होत आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks