ताज्या बातम्या

महिला महाविद्यालयात महिला दिन साजरा !

सावरवाडी ( प्रतिनिधी ) :

कसबा बीड ( ता . करवीर ) येथील महिला महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला .

यावेळी महिला दिनाचे औचित्य साधुन  स्त्री स्वातंत्र्य  या विषयावरील चित्र रेखाटन भिंतीपत्रकाचे  हिन्दी विभाग प्रमुख प्रा सुचिता भोसले यांच्या हस्ते उद्घघाटन करण्यात आले अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या मंजुश्री पवार होत्या . महाविद्यालयात विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी प्राचार्या मंजूश्री पवार , प्रा सुचिता भोसले प्रा पुजा पाटील , प्रा प्रियांका धनवडे , प्रा स्नेहल पाटील , वर्षा पाटील, प्रा प्रिती देवणे, आदिनी मनोगत व्यक्त केले  प्रास्ताविक कोमल पाटील , यांनी केले . शेवटी,प्राध्यापिका , विद्यार्थ्यांनी , कर्मचारी वर्ग उपस्थितीत होते .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks