ताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक

विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी शिक्षक-पालक यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत – प्राचार्य डॉ. जी. एस. म्हांगोरे

गारगोटी प्रतिनिधी :

शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2012 रोजी श्री माऊली विद्यापीठाचे अध्यक्ष माननीय सतीश उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मवीर हिरे महाविद्यालयाचे प्राचार्य जी एस म्हांगोरे प्रा राहुल चित्रकार, मिसाळ अभिजीत यांनी श्री शाहू कुमार भवन येथे वाचन संस्कृती चळवळ वाढवण्यासाठी श्री शाहू कुमार भवन चे मुख्याध्यापक डॉ एस बी शिंदे, श्री विक्रम भोसले, श्री सुभाष निगडे, श्री केसरकर सर, पाटील मॅडम व इतर स्टाफ यांचे उपस्थितीत विद्यार्थ्यांना शंभर किशोर मासिकांचे अंक वाटप केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विक्रम भोसले सर यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ जी एस म्हांगोरे सरांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व स्पष्ट केले परीक्षानंतर मिळणाऱ्या फावल्या वेळेत विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून शिक्षक पालक यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत वाचनाचा छंद लागण्यासाठी स्वतःही वाचन करावे व मुलांना आवडतील अशी सोपी पुस्तके वाचण्यास द्यावी, असे प्रतिपादन केले. याप्रसंगी बोलताना श्री शाहू कुमार भवन चे मुख्याध्यापक डॉ एस बी शिंदे सरांनी आपण वाचनातून कसे घडलो व विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षक स्टाफ च्या वतीने केले जाणारे प्रयत्न विशद केले सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना शंभर पुस्तकांचे वाटप करण्यात आले यानंतर आभार मानताना श्री सुभाष निगडे यांनी विद्यार्थ्यांनी शारीरिक व मानसिक मशागत करणे गरजेचे आहे असे सांगून आभार मानले

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks