Uncategorized

बिद्री येथे लोकल्याणकारी राजा राजश्री शाहू महाराज यांना १०० सेकंद स्तब्ध उभे राहून आदरांजली

बिद्री प्रतिनिधी : अक्षय घोडके

 लोकल्याणकारी राजा राजश्री शाहू महाराज स्मृति-शताब्दीकृतज्ञता पर्व निमित्त आज बिद्री येथे आज सकाळी ठीक १० वाजता सर्वांनी १०० सेकंद स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली. त्यावेळी बिद्री येथील व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष , उपाध्यक्ष सर्व संचालक , गोल्डन युवा ग्रूप, मौनी स्पोर्ट्स, शिवमूर्ती तरूण मंडळ चे सर्व सदस्य, दुकानदार, ग्राहक वर्ग व गावातील ग्रामस्थ उपस्थीत होते.  

लोकल्याणकारी राजा राजश्री शाहू महाराज यांनी कोल्हापूर साठी काय काय केल यावर थोडीशी नजर.

१) अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने शाहू राजांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली.

२) त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली.

३) स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. 

४) जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. 

५) जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा-धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.

६) अज्ञान, अस्पृश्यता, नीच निती आणि फसव्या रीतीना मोडून ह्या सगळ्या कुव्यवस्थेवर सरसकट समतेचा, समानतेचा नागर फिरवून समाजातील प्रत्येक घटकाला समान वागणूकीचे बिजांकुर पेरणाऱ्या राजाला क्रांतिकारी सलाम.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks