Uncategorizedताज्या बातम्या

एस आर ग्रुपच्या सुधीर राऊत यांनी बांधले शिवबंधन ; उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत केला प्रवेश

 

बिद्री/ प्रतिनिधी
साताराचे एस आर ग्रुपचे सर्वेसर्वा सुधीर राऊत यांनी मुंबई येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर झालेल्या या कार्यक्रमात एस आर ग्रुपच्या सातारा, कराड, राधानगरी, भुदरगड या तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधले. या प्रसंगी माजी मंत्री दिवाकर रावते, आम. दगडू सपकाळ, पश्चिम महाराष्ट्राचे उपनेते नितिन बानुगडे, प्राजक्ता राऊत आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, गेली अनेक वर्षे सातारा, कराड व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये एस आर ग्रुपने मोठ्या प्रमाणात विकासाच्या माध्यमातून आपले मावळे तयार केले आहेत. त्यांना पाठबळ देण्यासाठी आपली शिवसेना नेहमी तयार आहे.
यावेळी एस आर ग्रुपचे सुधीर राऊत म्हणाले, एस आर ग्रुपच्या माध्यमातून अनेक विकासकामांसोबत गोरगरीब व बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी वेगवेगळे मेळावे घेऊन अनेक तरुणांना नोकरी देण्याचे काम केले जात आहे. या पुढेही शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र कष्ट घेण्याची आपली तयारी आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम, संकेत सावंत, स्वप्निल पाटील, वस्ताद संदिप साठे, गणेश रानमाळे, दत्तात्रय चौगले, रफिक मोमीन,अनिल नलावडे, रवींद्र साळुंखे, बबन दळवी, संदीप ठोंबरे, अनिल जाधव, सुनील देशमुख, रुपेश चव्हाण, आमिर मुल्लाणी, संग्राम नाईक, प्रांजल शिंदे, योगेश कारंडे, सुश्मित ठोंबरे, अजय चव्हाण, निकेतन कदम, इंद्रजीत बोंद्रे, स्वप्नील पाटील, रोहन मुळीक, अमित भिसे, राहुल निकम, संदीप यादव, अनिस सय्यद, ऋषिकेश लोहार, गणेश रानमाळे, महिला आघाडीच्या प्राजक्ता राऊत, संध्या ठोंबरे, वंदना साळुंखे, पूजा शिंदे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks