ताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेमार्फत कुरुंदवाड येथे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन गट नियोजन बैठक

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

दिनांक १३ मार्च २०२४ रोजी डॉ.आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेमार्फत साधना मंडळ कुरुंदवाड येथे “नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन गट नियोजन बैठक” आयोजित केली होती.

कोल्हापूर जिल्ह्यातील बऱ्याच गावांना पुराचा फटका बसतो त्यामुळे गावातील लोकांना या आपत्तीपासून स्वतःचा व इतरांचा बचाव कसा करावा याबद्दल कागल,शिरोळ व हातकणंगले तालुक्यात संस्थेने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आहेत. यावर्षी पावसाळा येण्यापूर्वी आपत्ती येऊ नये म्हणून काय करता येईल यावर चर्चा व नियोजन करण्यासाठी शिरोळ तालुक्यातील विविध गावातून काही प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी निसर्गमित्र अनिल चौगुले यांनी कचरा व्यवस्थापन कसे करावे यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी डॉ.आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेचे संस्थापक ललित बाबर, इंजि.विजयकुमार दिवाण (सेवा निवृत्त उपअभियंता जलसंपदा विभाग सांगली) व इंजिनियर प्रभाकर केंगार यांचेसह संस्थेचे कार्यकर्ते बाबा नदाफ,शबाना शेख,अमोल कदम,नीता आवळे व रविना माने उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks