ताज्या बातम्यानिधन वार्ता

जुण्या पिढीतील कुस्ती मल्ल आनंदराव लोंढे यांचे निधन

सावरवाडी प्रतिनिधी :

करवीर तालुक्यातील सावरवाडी  येथील जूण्या पिढीतील प्रसिद्ध कुस्ती मल्ल व सामाजिक  कार्यकर्त   आनंदराव गणपतराव लोंढे ( वय ९५ ) यांचे वृध्दापकाळाने  निधन झाले . ते खंडोबा सहकारी दुध संस्थेचे संस्थापक होते .

त्यांचा  शेतकरी कुंटूबात जन्म झाला होता .जुण्या काळात  बालपणापासुन त्यांनी प्राथमिक शिक्षण घेत कुस्ती  कलेचा छंद जोपासलेला  होता .  ग्रामीण भागात विविध गावच्या यात्रातील कुस्त्यांचे फड जिंकले होते . शेती व्यवसायाबरोबर दुग्ध व्यवसायाकडे वळले होते . त्यांनी रेशीम उद्योग, शेळीपालन व्यवसायही उभारले होते .  त्यांच्या निधनाने पारंपारिक कुस्ती क्षेत्रात पोकळी निर्माण झाली . कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत तुळशी नदीच्या तीरी त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले .

सामाजिक कार्यकर्त किरण लोंढे यांचे ते वडील होत त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी सुन नातवंडे असा परिवार आहे . रक्षाविसर्जन रविवारी सकाळी आठ वाजता आहे .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks