ताज्या बातम्याभारतमहाराष्ट्र

मोठी बातमी ! 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी, केंद्र सरकारची कारवाई

केंद्र सरकारने आज महत्त्वाचा निर्णय घेत 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी (18 OTT Platform Ban) घातली आहे. आक्षेपार्ह कंटेट असल्याच्या कारणावरून ओटीटी प्लॅटफॉर्म, अॅप्स आणि वेबसाईटवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. या प्लॅटफॉर्मवर अश्लील वेब सीरिज, चित्रपट दाखवले जात होते. सरकारने याबाबत संबंधितांना नोटीस बजावली होती. मात्र, त्यांनी अश्लील चित्रपट, वेब सीरिज हटवण्यात आले नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली.

अश्लील साहित्याचा प्रसार करणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याचा इशारा याआधीच केंद्र सरकारने दिला होता. गेल्या वर्षीही जून महिन्यात यासंदर्भात मंत्रालयात मोठी बैठक झाली होती. विशेष बाब म्हणजे ब्लॉक करण्यात आलेल्या 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये19 वेबसाइट्स, 10 ॲप्स आणि 57 सोशल मीडिया हँडलवर कारवाई करण्यात आली आहे. आयटी कायदा, भारतीय दंड संहिता आणि इतर संबंधित कायद्यासह अनेक कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

कोणत्या प्लॅटफॉर्मवर बंदीची कुऱ्हाड?
Dreams Films Voovi Yessma
Uncut Adda Tri Flicks X Prime
Neon X VIP Besharams Hunters
Rabbit Xtramood Nuefliks
MoodX Mojflix Hot Shots VIP
Fugi Chikooflix Prime Play

या प्लॅटफॉर्मवर एका कंटेटचा मोठा भाग हा अश्लील, आक्षेपार्ह आणि महिलांसाठी अपमानास्पद असल्याचे आढळून आले. समाजाचे नैतिक अध:पतन होईल असा प्रकारचा मजकूर होता. अनेक वेब सीरिजमध्ये शिक्षिका-विद्यार्थ्यामध्ये आणि कौटुंबिक नातेसंबंधातील व्यक्तींमध्ये शरीर संबंध असल्याचे दाखवण्यात आले. माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यातील कलम 67 आणि 67ए, आयपीसीचे कलम 292 चे उल्लंघन असल्याचे दिसून आले.

एक कोटींपर्यंत डाउनलोड
बंदी घालण्यात आलेल्या एका OTT अॅप्सला एक कोटींहून अधिक डाउनलोड करण्यात आले आहे. दोन अन्य प्लॅटफॉर्ममध्ये Google Play Store वर 50 लाखांहून अधिक डाउनलोड झाले. त्याशिवाय, ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सोशल मीडिया हँडलवर अश्लील ट्रेलर, दृष्य अतिरंजीत पद्धतीने दाखवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks