ताज्या बातम्याभारतमहाराष्ट्र

मोठी बातमी : जम्मू- काश्मीर मधील पुंछ येथील लष्करी वाहनांवर झालेल्या दहशतवादी हल्यात तीन जवान शहीद

जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील राजौरी सेक्टरमधील थानामंडी परिसरात दोन लष्करी वाहनांवर दहशतवादी हल्ला झाला. ज्यात तीन जवान शहीन झाले असून तीन जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनीही तत्काळ प्रत्युत्तर दिले. प्रत्युत्तर देताना लष्कराच्या तीन जवानांना प्राण गमवावे लागले. काल संध्याकाळपासून या भागात असलेल्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराची लढाई सुरू आहे. सैन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४८ राष्ट्रीय रायफल्सच्या परिसरात ही कारवाई सुरू आहे.

अतिरिक्त फौजफाटा दाखल…

माहितीनुसार, घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला असून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये अद्यापही चकमक सुरू असून वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत. घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे काल रात्री एक डीकेजी येथे संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली. आज संध्याकाळी संपर्क झाला ज्यानंतर समोरून हल्ला करण्यात आला, ज्याला प्रत्युत्तर देताना तीन जवानांना प्राण गमवावे लागले.

कसा झाला हल्ला ?

एक जिप्सी आणि एक मिनी ट्रक अशी दोन लष्कराची वाहने सुरनकोट येथील बुफलियाज येथून राजौरीतील थानमंडीकडे जात होती. येथे ४८ राष्ट्रीय रायफल्सचे मुख्यालय आहे. टोपा पीरच्या खाली वाहने येताच दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. डीकेजी आणि बुफलियाज दरम्यानचा भाग राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. इथे खूप घनदाट जंगल असल्याने दहशतवाद्यांनी फायदा घेत इथेच हल्ला केला, अशी माहिती ‘इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तसंस्थेने दिली

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks