ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगुड नगरपालिकेच्या खतनिर्मितीस शासनाकडून ‘हरित महासिटी ‘ ब्रँडची मान्यता

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूड नगरपरिषदेकडून शहरामध्ये स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत दैनंदिन निर्माण होणारा कचरा घरोघरी जाऊन संकलित करण्यात येतो. सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर करण्यात येतो, तर ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती केली जाते. यातून तयार होणाऱ्या खतनिर्मितीस शासनाकडून हरित महासिटी कंपोस्ट ग्रँड म्हणून मान्यता मिळाली आहे.

मुरगूड नगरपरिषदेने तयार केलेल्या सिटी खताची तपासणी खत नियंत्रण प्रयोगशाळा यांचेकडे करून घेतली आहे. शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापन करताना निर्माण होणाऱ्या विघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताची विपणन व विक्री करण्यासाठी हरित महासिटी कंपोस्ट असा शासनाचा नोंदणीकृत बँड वापरण्याची परवानगी देण्यात येते.

त्या अनुषंगाने तयार केलेल्या खताचा तपासणी अहवाल हरित महासिटी कंपोस्ट ब्रैड मिळण्यासाठी महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचलनालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) मुंबईचे राज्य अभियान संचालक यांच्याकडे सादर केला होता. नगरपरिषदेचा खत तपासणी अहवाल मानकांनुसार असल्याचे दिसून आल्याने हा ब्रैड वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कचरामुक्त, हागणदारीमुक्त, उत्कृष्ट स्वयंशाश्वत शहर, माझी वसुंधरा अभियानामध्ये यश मिळविले आहे. यासाठी सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले आहे. ब्रँडमुळे पालिकेस खताची विक्री व विपणन करण्यासाठी सोयीचे आहे. खताचा वापर करून नागरिकांनी स्वच्छ अभियानात योगदान द्यावे, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी संदीप घार्गे यांनी केले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks