ताज्या बातम्या

शिंदे गट,शिवसेनेची कोल्हापूर जिल्हा व शहर कार्यकारणीची तिसरी यादी जाहीर

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे 

कोल्हापूर,शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्यनेते व राज्याचे मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरात शिवसेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत असून, शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा व शहर कार्यकारणीमधील प्रमुख पदांवरील नियुक्त्यांचे दोन टप्पे पार पडले आहेत. या नियुक्तीचा तिसरा टप्पा आज जाहीर करण्यात येत आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारानुसार मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या व्यापक नेतृत्वास सर्वसामान्य, कट्टर शिवसैनिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नाम.मा.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास अनेक पदाधिकारी व शिवसैनिकांचा ओघ वाढत असून, आगामी काळात “गाव/प्रभाग तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक” या मोहिमेतून शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करणार असल्याचे प्रतिपादन केले आहे.

 शिवसेनेच्या पदाधिकारी निवडी जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 पत्रकार परिषदेच्या सुरवातीस नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली. यामध्ये उप जिल्हाप्रमुख पदी जेष्ठ हिंदुत्ववादी श्री.उदय दत्ताजीराव भोसले, श्री.रमेश नागेश खाडे आणि श्री.शिवाजीराव रंगराव पाटील, शिवसेना कोल्हापूर दक्षिण शहरप्रमुख पदी श्री.महेंद्र घाटगे, गडहिंग्लज शहरप्रमुख पदी श्री.अशोक बापू शिंदे, करवीर तालुकाप्रमुख पदी श्री.बिंदू रामचंद्र मोरे, करवीर तालुका समन्वयक पदी श्री.प्रकाश प्रल्हाद सूर्यवंशी, शिवसेना महाराष्ट्र रिक्षा चालक सेना जिल्हाप्रमुख पदी श्री.रमेश तुकाराम पोवार, शिवसेना महाराष्ट्र रिक्षा चालक सेना जिल्हा समन्वयक पदी श्री.विक्रम मनोहर पोवार, शिवसेना महाराष्ट्र रिक्षा चालक सेना कोल्हापूर उत्तर शहरप्रमुख पदी श्री.अल्लाउद्दीन उस्मान नाकाडे, शिवसेना महाराष्ट्र रिक्षा चालक सेना दक्षिण शहरप्रमुख पदी श्री.राजू निवृत्ती पोवार, , शिवसेना महाराष्ट्र रिक्षा चालक सेना उत्तर शहरसमन्वयक पदी श्री.अमोल विलास तिवारे , शिवसेना महाराष्ट्र रिक्षा चालक सेना दक्षिण शहर समन्वयक पदी श्री.मनोज बाळासो केवरे आणि शिवसेना फेरीवाले सेनेच्या शहरप्रमुख पदावर श्री.अर्जुन विजयकुमार आंबी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांचा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते भगवी शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

 यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार शिवसेनेने नेहमीच समाजकारणापेक्षा राजकारणाला दुय्यम स्थान दिले आहे. पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर करताना आनंद होत आहेच. पण, नियुक्त पदाधिकाऱ्यांनी सर्वसामन्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून दिल्यास अधिक आनंद होईल. यासह पक्षाच्या बांधणीसाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे. आगामी जिल्हापरिषद, महानगरपालिका, ग्रामपंचायत आदी सर्वच निवडणुकांच्या धर्तीवर गाव/प्रभाग तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक हि मोहीम हाती घेण्यात येणार असून प्रभागवार शाखांची पुनर्बांधणी करून जिल्ह्यात शिवसेनेचे भगवे वादळ पुन्हा निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे जागरूक राहुन सर्वसामन्य नागरिकांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय द्यावा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांना साजेस आणि मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांना अभिप्रेत समाजहिताचे काम करावे, असे आवाहनही त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना केले.

 यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महानगरसमन्वयक जयवंत हारुगले, उप-जिल्हाप्रमुख किशोर घाटगे, उप-जिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, कोल्हापूर उत्तर शहरप्रमुख रणजीत जाधव, उत्तर शहर समन्वयक सुनील जाधव, गडहिंग्लज तालुका प्रमुख संजय शिवरुद्र संकपाळ, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, महानगर समन्वयक पूजाताई भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks