ताज्या बातम्यामहाराष्ट्र

महा महिला बचत गट निधी लिमिटेड चा जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न.

मुदाळतिट्टा प्रतिनिधी:

जागतिक महिला दिनानिमित्त, महा महिला बचत गट निधी लिमिटेड व स्वराज्य एनजीओ व महा एनजीओ यांच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बोलत असताना , महा महिला निधी लिमिटेड च्या चेअरमन डॉ. निवेदिता येडूरे म्हणाल्या, घरापासून ते संसदेपर्यंत ज्यादिवशी महिलाच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग, सन्मान होईल, तो दिवस जागतिक महिला दिन म्हणून सार्थ होईल. माता-भगिनीना आर्थिक उन्नतीसाठी आपण अविश्रांत परिश्रम घेत महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तसेच यावेळी महा महिला निधी लिमिटेडच्या मॅनेजर विजया पाटील , महा महिला निधी लिमिटेडचे विस्तार अधिकारी राधिका फोंडके यांनी निधी लिमिटेडच्या योजनेची माहिती दिली. तसेच स्वराज्य संस्थेच्या वतीने संध्या कांबळे म्हणाल्या स्वराज्य एनजीओ च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे अभियान स्वराज्य संस्थेने उभे केले आहे, याचा सर्वांनी उपभोग घ्यावा असे प्रतिपादन केले. यावेळी महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच महा महिला निधी लिमिटेड कडून शेकडो महिलांना बिनव्याजी शिलाई मशीन वाटप करण्यात आले. यावेळी बँकेचे डायरेक्टर विमल पाटील, शितल थवी, दिपाली भाकरे व महा महिला निधी लिमिटेड चा स्टाफ अंकिता चौगले, प्राजक्ता पाटील, विद्या पाटील तसेच महा एनजीओ चे स्टाफ शितल कांबळे, व महिला वर्ग उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या वतीने महा महिला निधी लिमिटेड चे चेअरमन निवेदिता येडूरे यांनी कोल्हापूर जिल्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभ राहण्यासाठी बिनव्याजी १०,००० शिलाई मशीन उपलब्ध करून देणार आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलोनी खोलांबे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार शितल कांबळे यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks