ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिद्री कारखाना निवडणूक सुनावणीला विलंब ; आज पुन्हा पुढील सुनावणी

बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी आज गुरुवारी उच्च न्यायालयात झाली. प्रथम विरोधी गटाच्या वकिलांनी भूमिका मांडली. यास उशीर लागल्यामुळे न्यायालयाने सत्ताधारी गटाला शुक्रवारी म्हणणे मांडण्यास सांगितले. त्यामुळे उर्वरित सुनावणी आता शुक्रवार दि. २३ रोजी होणार आहे.

बिद्री साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीला शासनाने दिलेली स्थगिती उठवावी आणि कारखान्याची निवडणूक त्वरीत घ्यावी अशी मागणी सत्ताधारी गटाच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. यावर ७ जून रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने २२ जूनला पुढील सुनावणी घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज उच्च न्यायालयात न्यायाधीश एस. बी. शुक्रे आणि आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पहिल्यांदा विरोधी गटाला म्हणणे मांडण्याची संधी दिली.

विरोधी गटाचे वकील यांनी सविस्तर भूमिका मांडली. त्यांचे म्हणणे मांडण्यास अधिक वेळ लागला. त्यामुळे शुक्रवारी सत्तारुढ गटाला म्हणणे मांडण्यास न्यायालयाने सांगितले. आज दि. २३ रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी न्यायालय निर्णय देणार की पुन्हा पुढील तारीख मिळणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks