ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कळंबा कारागृहातील वरिष्ठ महिला तुरूंगाधिकारी मिरा बाबर यांना गोळ्या घालण्याची धमकी! उज्वला झेंडे यांच्यासह दोघांविरुध्द राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

कळंबा कारागृहातील वरिष्ठ महिला तुरूंगाधिकारी मिरा बाबर यांना गोळ्या घालण्याची धमकी देवून शिवीगाळ करण्यात आलाय. कारागृह प्रशासनाने संशयिताविरुध्द कठोर कारवाईची मागणी केलीय. याप्रकरणी बडतर्फ महिला पोलीस उज्वला झेंडे यांच्यासह दोघांविरुध्द राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, कोल्हापूर पोलीस दलातील बडतर्फ महिला पोलीस झेंडे यांचा मुलगा न्यायाधिन बंदी असून तो सद्या कळंबा कारागृहात आहे. कळंबा कारागृहात सद्या गंभीर गुन्ह्यातील न्यायाधिन बंदींचे वास्तव्य असल्याने सुरक्षिततेच्या दृष्ट्रीने कळंबा कारागृह आवारासह परिसरात प्रवेश करण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. अशातच रविवारी सायंकाळी उज्वला झेंडेसह बंग नावाच्या व्यक्तीने विनापरवाना कारागृह आवारात प्रवेश केला. कारागृह रक्षकांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितल्याने त्यांच्यात वादावादी झाली. याप्रकारानंतर वरिष्ठ महिला तुरूंगाधिकारी मिरा बाबर यांनीही त्यांना तत्काळ येथून जाण्यासाठी सुचना केल्या. त्यावर झेंडे ‘माझ्या मुलाला गोळी कोणी मारली? असे का विचारले, असा जाब विचारला. त्यानंतरही तिने ‘गोळ्या घालण्याची हिंमत होती आणि मी गोळ्या घातलेल्या आहेत. अजूनही गोळ्या घालू शकते’ अशी धमकी देवून शिवीगाळ केल्याचे तुरूगाधिकाऱ्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks