ताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयसिंगपूर : केंद्र शासनाच्या विरोधात थाळी बजाओ आंदोलन️

शिरोळ प्रतिनिधी :विनायक कदम

जयसिंगपूर येथील क्रांती चौकात इंधन व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या विरोधात केंद्र शासनाचा निषेध करण्याकरिता युवासेनाचे थाळी बजाओ आंदोलन झाले. शिरोळ तालुक्यातील युवासेना,युवतीसेना महिला आघाडी व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इंधन दरवाढीच्या विरोधात युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केलेल्या आवाहनानुसार व युवासेना जिल्हा विस्तारक डॉ.सतिश नरसिंग यांच्या मार्गदर्शनाने सदरचे आंदोलन येथील क्रांती चौकात रविवार दि.३ रोजी दुपारी ११ वाजता करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव,उपजिल्हा युवाअधिकारी प्रतिक धनवडे,जि.प.सदस्य स्वाती सासणे,ग्रा.पं.सदस्या मणिषा पवार यांनी केंद्र शासनाच्या विरोधात तिव्र निषेध व्यक्त केला.

या आंदोलनात जिल्हा उपप्रमुख मधुकर पाटील, तालुकाप्रमुख वैभव उगळे,सामर्थ्य सेना जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब बिलुरे, युवासेना युवाअधिकारी प्रमुख निलेश तवंदकर,शहर युवाअधिकारी आकाश शिंगाडे, ऊपअधिकारी अनिल पवार,दिग्वीजय चव्हाण,जयसिंगपूर शहरप्रमुख तेजस कुराडे – देशमुख महिला आघाडी शहरप्रमुख अर्चना भोजणे युवती सेनेच्या तेजस्विनी रजपूत, शुभांगी झळकी,आकाश थरपट्टी,सुशांत मलमे,अनिल पवारा,इजाज मुजावर,सुरज भोसले,आदित्य पाटील,गणेश तायडे,स्वप्निल चव्हाण,शुभम मलमे,चेतन माने,अभय मलमे,प्रणव होगले,अथर्व केकले,अक्षय पाटील,रोहित कुंभार,राजु सुतार,स्वप्निल गोधडे,शुभम लाटवडे व शिवसैनिक युवासैनिक पदाधिकारी उपस्थितीत होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks