आरोग्यताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक

चिमुरड्या अनुष्का ला हवा मदतीचा हात; ट्युमर ने एक डोळा गमावला; उपचारासाठी लाखोंची गरज : आनंदाधाम सेवाभावी संस्थेकडून मदतीचे आवाहन.

मुरगूड :

संपूर्ण भाव विश्व नजरेत सामावून घेऊन आंनदी जीवन जगण्याचा निर्धार घेऊन जन्मलेल्या दोन वर्षाच्या चिमुरडीला आपला एक डोळा गमवावा लागला आहे.ट्युमर मुळे डॉक्टरांना तिचा एक डोळा काढून टाकावा लागला.विद्रुप दिसणारा चेहरा बदलण्यासाठी आणि पुढील उपचारासाठी सुमारे अकरा लाख खर्च अपेक्षित आहे.हास्य गमावलेल्या या चिमुरडीला समाजातील दानशूरांच्या मदतीची गरज आहे.सद्या मुरगूड मधील आपल्या आजीकडे राहणाऱ्या अनुष्का विनोद तोरसे या दुर्दैवी चिमुरडीने केलेले आवाहन काळजाला भिडणारे आहे.

कागल तालुक्यातील खडकेवाडा येथील अमृता विनोद तोरसे याना दोन मुली, पती हॉटेल मध्ये कुठं तरी काम करत आहेत. याबाबत काहीच माहिती नाही त्यात त्यांना दारूच व्यसन,त्यामुळे घरात अठरा विश्व दारिद्र्य,मोलमजुरी करून गेल्या दहा वर्षापासून अमृता आपल्या दोन्ही मुलींना प्रेमाने वाढवत आहेत.दोन वर्षांपासून त्या आपल्या आई अंजना शिवाजी नलवडे मुरगूड यांच्याकडे वास्तव्यास आहेत. इथली परिस्थिती ही तशीच,अमृता च्या आई ही एक पत संस्थेत भिशी जमा करण्याचे काम करतात.

आपल्या दोन्ही नाती आणि मुलगी यांच्याबरोबर आनंदाने आलेला दिवस ढकलण्याचे काम आजी अंजना करत होत्या.दोन महिन्यांपूर्वी आजीच्या मांडीवर खेळणाऱ्या दोन वर्षांच्या अनुष्का च्या डोळ्यात पांढरा ठिपका दिसला.किरकोळ काय तरी असेल म्हणून मुरगूड मधील नेत्र रोग तज्ज्ञाकडे दाखवलं. त्यांच्या सांगण्यावरून आणखी काही तपासण्या करण्यात आल्या.आणि निदान झालं त्या चिमुकल्या अनुष्का च्या इवल्याश्या डोळ्यात ट्युमर झाला आहे.

तात्काळ तिला मिरज येथील रुग्णालयात दाखल केले.डॉक्टरांनी अनुष्का चा जीव वाचवायचा असेल तर तिचा डोळा काढून टाकायला पाहिजे असे सांगितले.आजी अंजना आणि आई अमृता तर कोलमडून गेल्या.शेवटी एकमेकीला धीर देत जेमतेम दीड दोन लाख गोळा करून प्राथमिक शस्त्रक्रिया करून अनुष्का चा जीव वाचवण्यासाठी तिचा डोळा काढून टाकण्याची निर्णय काळजावर दगड ठेवून घेतला.सद्या ती एका डोळ्याने आलेले संकट दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.पण अजून ही वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत उपचार घ्यावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.पुढील उपचारासाठी सहा केमो आणि विद्रुप झालेला चेहरा दुरुस्त करण्यासाठी सुमारे अकरा लाख खर्च अपेक्षित आहे.आजी अंजना,आई अमृता आणि निरागस अनुष्का यांच्या चेहऱ्यावर गेलेले हसू परत आणण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे आवाहन आनंदाधाम सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संदीप सरदेसाई यांनी केले आहे. 

बँक तपशील  :

खातेधारक नाव : अमृता विनोद तोरसे
खाते क्रमांक : 091110110022939
आय. एफ. एस. सी. कोड : BKID0000911
बँक ऑफ इंडिया (BANK OF INDIA)
शाखा : मुरगूड

संपर्क क्रमांक : +९१ ८४७३०१०५३५

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks