ताज्या बातम्यामहाराष्ट्र

महा महिला बचत गट निधी लि. शाखेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न.

या मुख्य शाखेचे उद्घाटन २६ ऑक्टोंबर २०२० ला महाराष्ट्राचे माजी गृहराज्य मंत्री बाळा नांदगावकर यांच्या हस्ते झाले होते.

कोल्हापूर प्रतिनिधी :

येथील महा महिला बचत गट निधी लिमीटेडच्या मुदाळतिट्टा मुख्यशाखेचा प्रथम वर्धापनदिन बुधवार ता. २६जानेवारीला संपन्न झाला. यावेळी महा महिला बचत गट निधी लिमिटेडचे चेअरमन डॉ निवेदिता येडूरे, व्हा चेअरमन विमल पाटील, संचालिका शितल थवी, दिपाली भाकरे, साक्षी बोटे, मॅनेजर सलोनी खुळांबे आदी उपस्थित होते. मुदाळ येथील महा महिला बचत गट निधी लि. या शाखेचा प्रथम वर्धापन दिन सोहळा अतिशय उत्साहाने संपन्न झाला.

या मुख्य शाखेचे उद्घाटन २६ ऑक्टोंबर २०२० ला महाराष्ट्राचे माजी गृहराज्य मंत्री बाळा नांदगावकर यांच्या हस्ते झाले होते.

महा महिला बचत गट निधी लिमिटेडचा प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधत आयोजीत केलेल्या यावेळी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व महिला बचत गटाचा गौरव कार्यक्रम यामध्ये प्रास्ताविक मांडत असताना महा निधी चे मॅनेजर सलोनी खुळांबे म्हणाल्या या एक वर्षाच्या कालावधीत या मुदाळ मुख्य शाखेचे शेअर्स संख्या १० हजार ९९७ असून सभासद भाग भांडवल १० लाख ९४ हजार ७५० रुपये आहे संचालक व प्रमोटर यांचे भाग भांडवल ५४ लाख आहे तसेच २६ लाख ६ हजार रूपयाच्या ठेवी जमा झाल्या असुन कर्जदारांना ६६ लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. तसेच वार्षिक उलाढाल १कोटी ४२ लाख ६६ हजार रुपये झाली असून वार्षिक नफा ५ लाख २७ हजार रुपये झाला तसेच महा निधीच्या सर्व ऑनलाइन सुविधा व सेवा महा महिला बचत गट निधी लिमिटेडने उपलब्ध करून दिल्यामुळे अल्पावधीतच या महा निधीने ग्राहकामध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे. यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ, अधिकारी वर्ग व कर्मचारी प्रयत्नशील आहेत असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महा महिला बचत गट लिमिटेडचे चेअरमन डॉ निवेदिता येडूरे म्हणाल्या नववर्षाच्या व प्रजासत्ताक दिनाच्या सोबत येतो महा महिला बचत गट निधी लिमिटेड चा वर्धापन दिन आपल्या सर्वांच्या शुभेच्छा च्या बळावर एक वर्षाचा यशस्वी प्रवास पूर्ण करून महा महिला बचत गट निधी लिमिटेड दुसऱ्या वर्षात प्रवेश करीत आहे. हा प्रवास सोपा निश्चित नव्हता पण तुमच्या सदिच्छेने तो आनंददायी झाला या निमित्ताने आयोजित केलेल्या स्नेहमिलन कार्यक्रमास आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद, यापुढे देखील असेच सहकार्य आपल्याकडून मिळेल अशी अपेक्षा करते.

महा निधीच्या माध्यमातून शेकडो महिलांना शिलाई मशीन बिनव्याजी कर्ज वाटप केले तसेच महिला सभासदांना पैठणी साडी वाटप, सभासदांना एक लाखाचा अपघाती विमा, व्यवसाय मार्गदर्शन, सेबी अंतर्गत आर्थिक नियोजन प्रशिक्षण कार्यशाळा, सभासदांना फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू व किरणामध्ये ५ ते ७० टक्‍क्‍यांपर्यंत निधीच्या माध्यमातून सूट दिल आहे तरी ग्रामीण व शहरी भागातील महिला बचत गटांनी सभासद होऊन महा महिला निधी लिमिटेड च्या सर्व योजनेचा व उपक्रमांचा लाभ घ्यावा व संधीचे सोने करावे असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमांमध्ये मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्य अध्यक्ष युवराज येडूरे म्हणाले, महाराष्ट्रातील महिला बचत गटानां स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी चे व्यासपीठ उभे केले होते. त्याचे आज सार्थक झाले या महिलांना स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी शेकडो महिलांना बिनव्याजी शिलाई मशीन दिल्या गेल्या. या माध्यमातून आज शेकडो महिला महा निधीच्या माध्यमातून रोजगार करत आहेत. हा उपक्रम महिलांना दिशा देणारा आहे, तसेच महा निधीच्या माध्यमातून सीबी अंतर्गत आर्थिक नियोजन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये जनजागृती करत आहे हाच सामाजिक वसा महा निधी जपत आहे. तरी ग्रामीण भागातील महिलांनी महा निधीस सभासद होऊन या महा निधीच्या योजनेचा लाभ घ्यावा.

तसेच यावेळी मनोगत व्यक्त करताना स्वराज्य निर्माण संस्थेचे अध्यक्ष संदीप बोटे म्हणाले महाराष्ट्र मध्ये ग्रामीण शहरातील महिलांना गुंतवणूक करण्याचे धडे हे एक वर्षांमध्ये महा निधीच्या माध्यमातून महिलांना मिळाले आणि याच माध्यमातून महिलांना रोजगार संबधी मार्गदर्शन मिळाले. महा निधीच्या माध्यमातून हा उत्कृष्ट असा काम महा निधी लिमिटेड करत आहे. यासाठी सर्व महिलांनी महा महिला बचत गट निधी लिमिटेडला जास्तीत जास्त सभासद होऊन या महा निधीला पुढे घेऊन जाण्यासाठी महिलांनी सहकार्य करावे, असे आवाहन बोटे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता पाटील यांनी तर आभार प्रविण कांबळे यांनी केले. यावेळी विलास पाटील, मनोज झोरे, तुकाराम भाकरे, अमित कोरे, वर्षा पाटील, शुभांगी जाना, स्वप्नाली सुतार, संदीप सरदेसाई, पूनम सरदेसाई यांसह महिला बचत गटाच्या महिला, प्रतिष्ठीत व्यापारी, शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त, राजकीय व्यक्ती यांच्यासह सभासद, ठेवीदार, खातेदार उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks