ताज्या बातम्या

मेघोली धरणफुटीच्या शेतकऱ्यांना वेळेत न्याय न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करू; गारगोटी आक्रोश मोर्चात सर्वपक्षीय आक्रमक

गारगोटी प्रतिनिधी :

हे महाविकास आघाडीचे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे.या सरकारवर वळ उठवायलाच पाहिजेतरच न्याय मिळेल यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही असा घणाघती आरोप राधानगरी भुदरगड चे माजी आमदार व बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन ते पी पाटील यांनी गारगोटी ता भुदरगड येथे मेघोली धरणफुटीच्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काढलेल्या अनेक पक्षाच्या आक्रोश मोर्चाच्या सभेत केला.
ते पुढे म्हणाले की, धरण फुटीनंतर २४ तासात या शेतकऱ्यांना , मयताच्या कुटुंबियांना मदत देणे गरजेचे होते.त्यातले काहीएक झाले नाही.
फुटलेल्या मेघोली धरणाचा चौकीदार आठ महिण्यापुर्वी बदललला व ते धरण वाऱ्यावर का सोडले? केवळ धरण फुटीसाठीच बदली केली काय?महिलेच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या प्रशासनावर मनुष्यवधाचा गुंन्हा दाखल करावा व शासनाने स्वखर्चाने तत्काळ या जमिनी पुर्ववत करून द्याव्यात व सर्व कर्ज माफ करावे असे सांगत माजी आमदार, बिद्री चेअरमन के पी पाटील यांनी त्यांच्या महाविकास आघाडीच्या शासनाला घरचाच आहेर दिला.
आज दुपारी दि ६ सप्टेंबर २९२१ रोजी दुपारच्या वेळी गारगोटीत काढलेल्या आक्रोश मोर्चाप्रसंगी आजोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.तहसिलदार कार्यालयासमोर हा आक्रोश मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
बिद्री साखर कारखान्या़चे चेअरमन के पी पाटील म्हणाले की, धरण गळतीचा विषय गेले अनेक वर्षे सुरु होता. अधिकाऱ्यांनी व प्रशासनाने दखल घेणे गरजेचे होते.आता किसीच्या दगडामूळे अनर्थ घडला असे अधिकारी सांगतात पण ते दगड वापरताना प्रशासन होते तरी कोठे? ही जबाबदारी प्रशासनाने घ्यावी.झाल्या प्रकारणाचा रिपोर्ट ऱाष्ट्रवादीचे नेते , राज्याचे अर्थमंत्री व जलसंपदा मंत्री ना जयंत पाटील यांच्याकडे देवून कारवाई करणार असे धडाकेबाज वक्तव्य बिद्री चेअरमन के पी पाटील यांनी या आक्रोश मोर्चात नेहमीच्या शैलीत केले.
यावेळी बोलताना युवा नेते राहूल देसाई म्हणाले की हा मोर्चा राजकिय स्वार्थासाठी नसून शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. विरोधकांनी जो विरोध केला आहे तो चुकीचा आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आता याद्या लावल्या आहेत.त्यांच्या हरकती घेतल्या नाहीत तर रस्त्यावर फिरू देणार नाही.या चारी गावावर पाणी फिरवायचे काम आमदारांच्या नेतृत्वामूळे झाले.हे आंदोलन आता थंड पडणार नाही याची दक्षता आता घेवूया.यावेळी बोलताना बाजार समिती संचालक सचिन घोरपडे म्हणाले की, या दुर्घटनाग्रस्त भागाला विषेश असे आर्थिक पँकेज द्यावे लागेल.ना सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या माध्यमातून आंम्ही या पाठपुराव्यात सक्रीय राहाणार आहोत.
या धरण फुटीमूळे हा शेतकरी २० वर्षे मागे गेल्याचे विश्वजीत जाधव यांनी सांगितले.यावेळी शिवाजी परुळेकर, शरद मोरे,शशिकांत पाटील, नाथाजी पाटील, मोर्चाचे निमंत्रक मच्छिंद्र मुगडे, कॉंम्रेड सम्राट मोरे, विनायक परुळेकर, युवराज येडूरे,विश्वनाथ कुंभार, तानाजी तळकर, मारूती तळकर, आदिंनी घणाघती आरोप या प्रशासनावर केले.धरण दोन वर्षीत पुर्ण करून घ्यावे.धरणाचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे, शासनाने या शेकऱ्यांची सर्व कर्जे माफ करावी अशा अनेक मागण्या या कार्यकर्त्यानी या आक्रोश मोर्चात केल्या.या मोर्चात अनेक पक्षाचे शेकडो कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks