ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोण होणार देशाचे नवे राष्ट्रपती ? राष्‍ट्रपतीपदासाठी १८ जुलैला मतदान ; तर २१ जुलै रोजी निकाल जाहीर होणार

टीम ऑनलाईन :

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज राष्‍ट्रपतीपदाच्‍या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. राष्‍ट्रपती (candidacy) पदासाठी १८ जुलैला मतदान होणार असून २१ जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे.

देशातील सर्वोच्‍च पदासाठी हाेणार्‍या निवडणुकीची अधिसूचना १५ जून रोजी जाहीर हाेईल. उमेदवारी (candidacy) अर्ज दाखल करण्‍याची अंतिम तारीख २९ जून असेल. अर्जाची छाननी ३० जून रोजी होईल, तर दोन जुलैपर्यंत अर्ज माघारीचे मुदत असेल. राष्‍ट्रपतीपदासाठी १८ जुलैला निवडणूक होणार असून, २१ जुलै रोजी निकाल जाहीर होणार असल्‍याचे निवडणूक आयाेगाने स्‍पष्‍ट केले.

राष्‍ट्रपतीपदासाठी होणार्‍या मतदानावेळी मतदाराला एक, दोन आणि तीन असे पर्यात लिखित स्‍वरुपात द्‍यावे लागणार आहेत.
त्‍यांनी जर आपली पहिल्‍या पसंतीचा रकाना रिकामा ठेवल्‍यास ते मत बाद ठरेल, असेही निवडणूक आयोगाने स्‍पष्‍ट केले. या निवडणुकीत राज्‍यसभेतील राष्‍ट्रपती नियुक्‍त १२ सदस्‍यांना मतदानाचा अधिकार असत नाही.

२४ जुलै रोजी पूर्ण होणार कोविंद यांचा कार्यकाळ……

१७ जुलै २०१७ रोजी राष्‍ट्रपतीपदाची निवडणूक झाली होती. राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै २०२२ रोजी पूर्ण होणार आहे. लवकर भाजप नेतृत्‍वाखालील एनडीए राष्‍ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर करणार आहे. राष्‍ट्रपती निवडणुकीबाबतचे चित्र पुढील काही दिवसांमध्‍ये स्‍पष्‍ट होणार आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks