ताज्या बातम्यामहाराष्ट्र
वळीवडे ग्रामपंचायत हद्दीत तुकडा क्षेत्राची खरेदी झालेल्या प्रकरणाची चौकशी करा : सतिश माळगे

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
वळीवडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गट क्रमांक १९० अ ही शेती मिळकत असताना बनावट खरेदी केल्याप्रकरणाची सखोल चौकशी करावी अश्या मागणीचे निवेदन आरपीआयच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना शुक्रवारी देण्यात आले.
करवीर तालुक्यातील वळीवडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गट क्रमांक १९० अ मधील जमीन शेती मिळकत असताना याबाबतची माहिती लपवून ठेवून प्रशासनाची दिशाभूल करत बनावट खरेदी केल्याप्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे आरपीआयच्या वतीने निवेदनाद्वारे शुक्रवारी करण्यात आली, याबाबत तहसीलदारांना सूचना करू असे असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात सतीश माळगे, प्रवीण आजरेकर, प्रवीण निगवेकर, शिवतेज खोत उपस्थित होते.