जीवनमंत्रताज्या बातम्यामनोरंजनसामाजिक

विशेष लेख :: कोण म्हणतंय “द काश्मीर फाईल्स” मुस्लिम विरोधी आहे? तो तर अतिरेक्यांचा हिडीस नंगानाच आहे.

शब्दांकन : व्ही. आर. भोसले

महाराष्ट्रातील एका छोट्या शहरात नवरात्रोत्सव सुरू होता .भर चौकात एक मशीद .आणि मशिदी समोरच दुर्गेची स्थापना .तीही स्थपित केली होती मुस्लिम व मराठा युवकांनीच.
दुर्गेसमोर युवक युवती नाच नाच नाचत होते आणि घाम पुसायला मशिदीत बसत होते .

केवढं विहंगम दृश्य होते ते !
महाराष्ट्रात पन्नासभर लाखा लाखांचे मराठा मोर्चे निघाले .कोल्हापूर शहरातील मोर्चाला मुस्लिम युवकांनी व्हेज बिर्याणी खाऊ घातली .

चीनी आक्रमणाचे वेळी अब्दुल हमीदने डझनभर चिन्यांना कंठस्नान घालून मगच प्राण सोडला .
कुसुमाग्रज यांची त्यावेळची कविता देशभर गाजली .

बर्फाचे तट पेटूूनी उठले
सदन शिवाचे कोसळले .।
रक्त आपुल्या प्रिय आईचे
शुभ्र हिमावर ओघळले ।।

अब्दुल हमीदचे रक्त म्हणजे मातृभूमीचेच रक्त होते.
केवढा महान अर्थ यात भरला आहे !
अनेक राष्ट्रांनी ठासून सांगितले आहे .

दहशतवादाला कोणताही धर्म नाही .कोणत्याही धर्मग्रंथात हिंसाचाराचा लवलेश नाही .

‘काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट मुस्लिम विरोधी नाही .तो तर अतिरेक्यांचा हिडीस नंगानाच आहे .

 

स्वतःला पुरोगामी आणि द्रष्टे समजणारे कांही लोक मात्र त्याला मुस्लिम विरोधी ठरवतात ,आणि हिंदुमुस्लिम ऐक्याचा डोस पाजायला उठतात .

त्यात अभिनेता नाना पटेकरही आहे .तो वादग्रस्त वक्तव्या बद्दल आणि आचरणाबद्दल प्रसिद्ध आहेच .
अशांना द्रष्टे म्हणण्यापेक्षा नतद्रष्ट म्हणणे योग्य ठरेल .उगीचच फोडणी टाकायची .
वर म्हणायचे मी चित्रपट अजून पहिला नाही .
हे एक उदाहरण झाले .

हा चित्रपट भाजप वाल्यांचा आहे असे मानून विरोधी पक्षाच्या पुढाऱ्यांनी जिभेच्या तलवारीला उगीचच धार लावली .
कांही राज्यांनी चित्रपट करमुक्त केला .त्यात तिकीट दर स्वस्त होऊन प्रेक्षकसंख्या वाढावी हाच उद्देश असतो .
थिएटर मालकाला कांही नुकसान नाही .
सरकारचा कर कमि होईल पण हजारो प्रेक्षकांचा दुवा मिळेल .
पण पुढाऱ्यांना ‘राजकीय फोबिया ‘चढतो .मतपेटीला बाधा येईल असे त्यांना वाटत असावे .
महाराष्ट्र विधानसभेत या चित्रपटावर जोरात चर्चा झाली .
मनाला पटतंय पण वठवता येत नाही अशी अवस्था सत्तेतल्या पुढाऱ्यांची झाली आहे .

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणतात की इथे टॅक्स फ्री करण्या ऐवजी केंद्रानेच जीएसटी कमि करावी असा अजब सल्ला दिलाय .
म्हणजे धरलं तर चावतय व सोडलं तर पळतय अशी या पुढाऱ्यांची अवस्था झालीय .

काँग्रेस नेते पटोले असंच कांही तरी बोलून गेले .गोध्रा व पूलवामा वर चित्रपट काढा असे ते म्हणतात .
थोडक्यात काय ‘त्या लाखो पंडितांच्या वर झालेल्या अमानुष अत्याचारावर ,भर रस्त्यात स्त्रियांच्यावर झालेल्या बलात्काराचे ,लहान मुलांच्याही हत्याकांडाचे या पुढाऱ्यांना व सेलिब्ब्रिटिना कांहींच कसे वाटत नाही .

काश्मीर मधील हत्याकांड भारतीय मुस्लिमांनी नव्हे तर पाकिस्तान धार्जिण्या अतिरेक्यांनी केले होते व त्यांना तसल्याच प्रवृत्तीच्या फुटीरतावादी पुढाऱ्यांनी भडकावले होते .
त्यावेळी कोट्यवधी मुस्लिम उर्वरित भारतात बंधुभावाने रहात होते .

मार्क्स म्हणतो “धर्म म्हणजे अफूची गोळी असते .”
वास्तविक ही अफू अतिरेक्यांनीच स्वतःच्या उद्दिष्टपूर्ती साठी तयार केलेली असते .
मशिदी ,मंदिरे ,गिरीजघरे ,ही प्रार्थना स्थळे आहेत .अतिरेक्यांनी त्यांना हिंसाचाराचे अड्डे बनवले .

१९९० म्हणजे कांही फार मागचा इतिहास नाही .आपल्याच भूमीतल्या निष्पाप बंधुभागीनीवर होणाऱ्या अमानुष अत्याचाराला असे नजरअंदाज केले तर स्वतंत्र भारताच्या अस्मितला लक्तरे पांघरल्याचे पाप लागेल .
परवा पोलंडचे ऐंशी वर्षे उलटून गेलेले कांही नागरिक कोल्हापूरात येऊन गेले .दुसऱ्या महायुद्धात शाहूमहाराज यांनी त्यांना गांधींनगर येथे आश्रय दिला होता .

माणुसकी हाच खरा धर्म हे पोलंडच्या त्या वृद्धांनी साऱ्या देशाला सांगितले आहे .
हिंसाचाराला राजकीय बॉम्ब बनवू पाहणाऱ्या पुढाऱ्यांना व तथाकथित पुरोगाम्यांना जनतेनेच धडा शिकवला पाहिजे .

शब्दांकन : व्ही. आर. भोसले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks