ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

Samarjeetsinh Ghatge on Hasan Mushrif : मुश्रीफ साहेब अमित शाह नाही, तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना देखील भेटतील; समरजित घाटगेंचा खोचक टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते हसन मुश्रीफ आणि त्यांचे कागल तालुक्यातील कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समाजितसिंह घाटगे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत.

कोल्हापूर :

माजी मंत्री आणि कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि त्यांचे कागल तालुक्यातील कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समाजितसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. आज समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला. मुश्रीफ यांनी शाहू दूध संघावरून 15 कोटी लाटल्याचा आरोप समरजितसिंह घाटगे यांनी केला होता. या आरोपांवरून त्यांनी आता जाहीर आव्हान दिलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, आरोप सिद्ध करावेत अन्यथा 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला. 

मुश्रीफ साहेब 40 हजार शेतकऱ्यांचे 40 कोटी कोठे गेले? अशी विचारणा त्यांनी यावेळी केली. समरजीतसिंह यांनी सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यावरून पुन्हा एकदा तोफ डागली. ते म्हणाले की, मुश्रीफ साहेब 40 हजार शेतकऱ्यांचे चाळीस कोटी कोठे गेले. मुश्रीफ साहेबांनी शेतकऱ्यांना खोट्या पावत्या दिल्या.  कारखान्यासाठी हा पैसा गोळा करण्यात आला होता. आता 16 पुढे आली आहेत, उद्या 40 हजार शेतकरी बाहेर पडतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कारखान्याचे मालक म्हणून हसन मुश्रीफ आणि त्यांचे नातेवाईक कागदोपत्री दिसून येत आहे, मग 40 हजार शेतकरी कुठे गेले याची माहिती द्यावी. 

अमित शाह नाही, तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही देखील भेटतील

त्यांनी सांगितले की, 40 हजार शेतकऱ्यांची सर्वसाधारण सभा कधी घेतली याचाही पुरावा त्यांनी द्यावा. दरम्यान मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्या सोबतीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनुषंगाने सर्व माहिती देण्यासाठी अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे म्हटले होते. यावरून त्यांनी टोला लगावला. ते म्हणाले की, मुश्रीफ साहेब अमित शहा नाही, तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही देखील भेटतील. इतकच नाही तर जी-20 परिषदेमध्ये जाऊन कारखान्यासाठी कर्ज मागतील. 

कोण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार हे जनता ठरवेल

माझ्या बदनामीचे षडयंत्र रचणाऱ्यांचा जनता करेक्ट कार्यक्रम करेल, अशा शब्दात समरजित घाटगेंच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांनी पलटवार केला होता. यावरून आता समरजितसिंह यांनी कोण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार हे जनता ठरवेल, असा टोला लगावला आहे. दरम्यान मुश्रीफ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यानंतर समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. काल (24 फेब्रुवारी) गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस ठाण्यासमोरच कार्यकर्त्यांकडून ठिय्या मांडण्यात आला होता. आजही त्याचे संतप्त पडसाद मुरगुडमध्ये उमटले. मुरगूड पोलिस ठाण्यासमोर शेकडो समर्थकांनी मुश्रीफ यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. यावेळी जमाव पाहून पोलिसांकडूनही अतिरिक्त कुमक मागवण्यात आली होती.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks