खत दरवाडीच्या निषेधार्थ राधानगरी काँग्रेसचा तीव्र आंदोलनाचा इशारा

कौलव/वार्ताहर
केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ करून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू केलीय. एका हाताने दोन हजार रुपये शेतकऱ्या दिले. खताची दरवाढ करून दुसऱ्या हाताने शेक-र्यांकडून पैसे काढून घेतले जात आहेत. रासायनिक खतांची केलेली दरवाढ मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राधानगरी विधानसभा मतदार संघाचे समनव्यक सुशिल पाटील कौलवकर युवा मंच व तालुका काँग्रेस (आय) च्या वतीने निवेदनाद्वारे राधानगरी चे तहसीलदार मीना निबाळकर यांना देण्यात आले.
निवेदनातील आशय असा केंद्र शासनाने शेतीसाठी लागणाऱ्या डीएपी, युरिया,मिश्र खत अशा रासायनिक खतांच्या किंमतीत दीड पटीने वाढ केली आहे. शेतकरी नैसर्गिक संकटांनी आधीच कर्जाच्या विळख्यात सापडला आहे. कोरोना महामारीच्या काळात खताची दरवाढ करून शेतकऱ्याची थट्टा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच कोरोना काळात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला कवडीमोल किंमत मिळत आहे. शेतातील शेतीमाल जागेवर कुजत पडला आहे. अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकला असतानाच शेतीला लागणाऱ्या अनेक वस्तूंच्या किंमतीत भरमसाट वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमती वाढविणे चुकीचे आहे. अन्यायी दरवाढ तात्काळ थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कांग्रेस आय चे समनव्यक सुशील पाटील (कौलवकर),
भोगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले ,विद्यमान संचालक संचालक संजयसिंह पाटील,माजी सरपंच सागर धुंदरे, पंचायत समितीचे सदस्य उत्तम पाटील (येळवडेकर), शहाजी कवडे,सरपंच सुभाष पाटील, राहुल चौगले, रवी पाटील तारळेकर, दिगंबर येरूडकर, वैभव तहसीलदार, राजेंद्र पाटील (कौलवकर) , प्रभाकर पाटील (चंद्रेकर) युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव तहसीलदार, शहाजी कवडे,इंद्रजित पाटील,राहुल चौगले, बाजीराव चौगले,अमर वनकुंद्रे, आदीनी दिला आहे.