ताज्या बातम्यामहाराष्ट्र

जैविक कोळसा प्रकल्प अर्थक्रांती घडवून आणेल : प्रदिप करडे ; नंद्याळ येथे जैविक कोळसा प्रकल्प भुमिपुजन सोहळा संपन्न

राजर्षीराज प्रोडूसर कंपनी लिमिटेड कागल व एमसीएल मुंबई यांचे कडून नंद्याळ गावांमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती दिवशी जैविक कोळसा प्रकल्प भुमि पुजन सोहळा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी राजर्षीराज प्रोडूसर कंपनी लिमिटेड कागल च्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंती यावर्षी शाहू जन्मस्थळाहुन समता व प्रेरणा ज्योत घेऊन दौड करून कागल हुन आणुर अर्जुनवाडा ते नंद्याळ भुमिपुजन सोहळा पर्यंत आणली.

तालुक्यात होणाऱ्या या पहिल्या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ झाला,वाढत्या तापनाला कारणीभूत असणारा जीवाश्म कोळश्याला पर्याय म्हणून पर्यावरण पूरक जैविक कोळसा शाश्वत उपलब्ध करून पर्यावरण संवर्धनासाठी कंपनी काम करत आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नंद्याळचे उपसरपंच मा.प्रदिप करडे होते

सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख पाहुणे कंपनीचे सीईओ मा. किरण पाडूरंग घुगरे सर, डायरेक्टर ,उद्योजक ,चैनल पार्टनर,सभासद व इतर तालुक्यातील प्रमुख भुदरगड हून रोहित भांडवले , खानापूर तालुका श्रीनिवास धोत्रे व प्रविण पाटील , निपाणी तालुका प्रमुख संजीव जाधव , हूक्केरी तालुका प्रमुख संतोष कूष्ठे ,राधानगरी तालुका प्रमुख संतोष खोडवे व बाबासो खोडवे , हातकणंगले तालुका प्रमुख शशिकांत भोजे  तसेच मोठ्या संख्येने सभासद शेतकरी उपस्थित होते. स्वागत मा. डायरेक्टर समिर शिलवत यांनी केले तर  आभार मा. डायरेक्टर हरी आवळे यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks