क्रीडाताज्या बातम्या

आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धत मुरगूडच्या जान्हवी सावर्डेकरने पटकावली चार सुवर्णपदके

जान्हवी सावर्डेकर हिने यापुर्वी महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धातुन ज्युनियर, सिनीयर गटात सुवर्ण व रौप्यपदके पटकावली आहेत . तसेच अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पॉवरलिफ्टींग अजिक्यपद स्पर्धत सुवर्ण, रौप्यपदके पटकावली आहेत.

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

इस्तंबुल ( तुर्की ) येथे आज झालेल्या आशियाई वरिष्ठ गट पॉवरलिफ्टिंग स्पर्धत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मुरगूडच्या कु . जान्हवी जगदीश सावर्डेकर हिने ६९ किलो गटात चार प्रकारात भारताला चार सुवर्णपदके मिळवून दिली आहेत.

जान्हवी सावर्डेकर हिने ६९ किलो गटात स्कॉड १९० , बेंचप्रेस १२०, डेडलिफ १८७ .५ टोटल ४९७ .५ वजन उचलले . या तीनही प्रकारात प्रत्येकी सुवर्णपदक व ओव्हर ऑल कामगिरीबद्दल सुवर्णपदक अशी चार सुवर्णपदके भारताला मिळवून दिली आहेत .जान्हवीने कज़ाकिस्तानच्या स्पर्धकास(टोटल ४८५) व फिलीपाइन्स च्या स्पर्धकास (टोटल ४६२ .५ ) मागे टाकत स्पर्धत वर्चस्व गाजविले.

जान्हवी सावर्डेकर हिने यापुर्वी महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धातुन ज्युनियर, सिनीयर गटात सुवर्ण व रौप्यपदके पटकावली आहेत . तसेच अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पॉवरलिफ्टींग अजिक्यपद स्पर्धत सुवर्ण, रौप्यपदके पटकावली आहेत.

राष्ट्रीय व राज्य व विद्यापीठ स्तरावर १३ सुवर्ण, ५ रौप्य व ४ कांस्यपदके पटकावली आहेत .तिला बिभीषण पाटील, प्रशिक्षक विजय कांबळे यांचे मार्गदर्शन तर प्रा . प्रशांत पाटील शहाजी कॉलेज. कोल्हापुर, वडील जगदीश सावर्डेकर, भाऊ मयुर सावर्डेकर यांचे प्रोत्साहन लाभले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks