ताज्या बातम्या

महामानवांचे विचार प्रेरणादायी – दिलीप चौगले

बिद्री प्रतिनिधी/अक्षय घोडके:

राजमाता जिजाऊ या सर्वांच्याच प्रेरणास्थान असून प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य घडविण्याचे काम राजमाता जिजाऊंनी केले आहे. आजच्या युवा पिढीने राजमाता जिजाऊंच्या विचारांचा वारसा जोपासावा. स्वामी विवेकानंद यांचे आचार, विचार तरुण पिढीला मार्गदर्शक आहेत.महामानवांचे विचार युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन दिलीप चौगले यांनी केले.

        बोरवडे विद्यालय बोरवडे (ता. कागल ) या विद्यालयात आयोजित केलेल्या राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

           राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन मनीषा साठे यांच्या हस्ते तर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन दिलीप चौगले यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन रेश्मा देवर्डेकर व शिवाजी बचाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर. पी. वारके यांनी मनोगत व्यक्त केले.

         यावेळी मुख्याध्यापक ए. आर. वारके, ई.डी.घोरपडे, पी.डी.वारके, एस.डी. बचाटे, मनीषा साठे, गीता बलुगडे, रेश्मा देवर्डेकर, राधिका शिंदे, कीर्ती साळुंखे, एस. टी. कांबळे, के.डी.साठे,व्ही. व्ही. कांबळे उपस्थित होते.

          आर. पी. वारके यांनी प्रास्ताविक केले. रेश्मा देवर्डेकर यांनी आभार मानले.

   बोरवडे विद्यालय बोरवडे (ता. कागल ) येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त बोलताना दिलीप चौगले. शेजारी मनीषा साठे, रेश्मा देवर्डेकर व इतर

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks