ताज्या बातम्याराजकीय

के.पीं.नी देशातील सर्वोच्च एफ.आर.पी. शेतकऱ्यांना दिली : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

नानीबाई चिखलीत प्रचार सभा

बिद्री प्रतिनिधी/ अक्षय घोडके :

माजी आमदार के.पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिद्री सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना राज्यासह सबंध देशातील सर्वोच्च एफ.आर.पी. दिली आहे. महिन्याच्या -महिन्याला कामगार पगारासह चांगला तोडणी -वाहतूक दर आणि कामगारांना उच्चांकी बोनसही दिला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

नानीबाई चिखली (ता. कागल) येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब वडगुले होते. 

ते पुढे म्हणाले, बिद्री साखर कारखाना हा ६५ हजार ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. सहवीज प्रकल्पाला, इथेनॉल प्रकल्पाला सातत्याने विरोध करणारे विरोधी बाजूने निवडणूक लढवीत आहेत. सभासद त्यांचा निश्चितच हिशोब ठेवतील.”  

तत्पूर्वी लिंगनूर कापशी, गलगले, खडकेवाडा, बस्तवडे, सोनगे व कुरुकली येथेही प्रचारसभा झाल्या. जिल्हा परिषद सदस्य अमरीशसिंह घाटगे, उमेदवार गणपतराव फराकटे, प्रवीणसिंह पाटील, रंगराव पाटील, पैलवान रवींद्र पाटील, रावसाहेब खिल्लारी, सौ. रंजना आप्पासाहेब पाटील, सुनील सूर्यवंशी, सरपंच अल्लाबक्ष सय्यद, प्रकाश वाडकर, अनिल गुरव, महंमद मुल्लाणी, शिवाजी तळेकर, उत्तम पाटील, श्रीशैल नुल्ले आदी उपस्थित होते.

दरम्यान,पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी ऊसदर आंदोलनामध्ये सन्मानजनक तोडगा काढल्याबद्दल स्थानिक आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्यावतीने त्यांचा सत्कार झाला. स्वागत व प्रास्ताविक बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. आभार सरपंच अल्लाबक्ष सय्यद यांनी मानले.

पलीकडे चेअरमन पदासाठी लाथाळ्या….. ! 

 जिल्हा परिषद सदस्य अमरीशसिंह घाटगे म्हणाले, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिद्री कारखान्याची यशस्वी वाटचाल गौरवास्पद आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली भविष्यातही वाटचाल अशीच राहील. परंतु; विरोधी आघाडीमध्ये आधीच चार ते पाच जण चेअरमन पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. अजून प्रचार, मतदान, निकाल शिल्लक आहे. तोपर्यंतच त्यांच्यामध्ये चेअरमन पदासाठी लाथाळ्या सुरू आहेत.

नानीबाई चिखली (ता. कागल) : येथे ऊसदर आंदोलनामध्ये सन्मानजनक तोडगा काढून गळीत हंगाम सुरळीत केल्याबद्दल शेतकऱ्यांच्यावतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सत्कार प्रसंगी प्रवीणसिंह भोसले, अमरीशसिंह घाटगे, गणपतराव फराकटे, रावसाहेब खिल्लारी आदी

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks