कोल्हापूर येथे हॉटेल कामगारांना आभा कार्डचे वाटप

चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
कोल्हापूर,आजरा,चंदगड व गडहिंग्लज मधील हॉटेल कामगारांना भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्या वतीने आयुष्यमान भारत कार्ड चे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी विजयेंद्र माने होते सदर कार्यक्रमाचे उदघाटन वसुंधरा न्यूज संपादक विजय तोडकर यांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलन उद्योजक यश मिरजे व मान्यवर यांच्या हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष अनिलराव कांबळे हे होते.
हा कार्यक्रम मुख्याध्यापक हॉल हॉटेल पंचशील च्या मागे शिवाजी पार्क कोल्हापूर या ठिकाणी झाला यावेळी हॉटेल कामगारांना आयुष्यमान भारत कार्ड वाटप तसेच मानसिक आरोग्य शिबिर कार्यक्रम पार पडला तर मानसोपचार तज्ञ डॉ पंकज खोत ,हॉटेल कामगार हजर होते.
यावेळी हॉटेल कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिलराव कांबळे आणि पत्रकार विजय तोडकर यांची भाषणे झाली यामध्ये हॉटेल कामगार संघटना अध्यक्ष अनिलराव कांबळे यांनी प्रामुख्याने तीन मागण्यांचा उल्लेख सरकारकडे केला मागण्या आशा महाराष्ट्र हॉटेल कामगार कल्याणकारी मंडळ व्हावे , नंबर प्रायव्हेट अँड फंड आणि ई एस आय प्रत्येकाला चालू व्हावा ,प्रत्येक कामगाराला विमा संरक्षण कवच मिळावे आदी मागण्या केल्या आभार समाजसेवक शिंदे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी सहकार्य भाजप नेते शिवाजीराव पाटील व समाज सेवक नरसू शिंदे यांच्या सहकार्यातून झाले यावेळी हॉटेल कामगार संघटनेचे सदस्य कृष्णा चिमणी, रमेश नाईक ,धनाजी भोसले ,विजय दरेकर ,रवी पाटील,बहुसंख्य हॉटेल कामगार तसेच पत्रकार पुंडलिक सुतार,संजय पाटील अध्यक्ष मुख्याध्यापक संघ ,शरद उंडगे,तसेच मान्यवर उपस्थित होते.