तंत्रज्ञानताज्या बातम्यामहाराष्ट्र

दलित इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (DICCI ) संस्था आणि शाहू समूह एकत्रितपणे देणार बहूजन उद्योजकतेला प्रोत्साहन : समरजितसिंह घाटगे

कागल प्रतिनिधी :

दलित इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (DICCI ) व शाहू समूह एकत्रितपणे बहूजन समाजातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करतील,असे प्रतिपादन राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज व शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी केले.
पुणे येथील दलित इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (DICCI) मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचा कृतिशील वारसा या विषयावर संवाद साधताना ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले ,दलित उद्योजकता विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने कार्यरत असणारी DICCI संस्था आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या बहुजन विकासाचे स्वप्न घेवून प्रयत्नशील असणारा कागलचा शाहू समूह या दोन्ही संस्था या महापुरुषांचा कृतिशील वारसा पुढे चालवत आहेत. यापुढील काळात आम्ही एकत्रित येवून बहुजन समाजाच्या विकासाचे स्वप्न साकार करू.

छत्रपती शाहू साखर कारखाना, राजे बँक,एकूणच शाहु उद्योग समूहाच्या माध्यमातून आम्ही सामाजिक विकासासाठी कार्यरत आहोत. बहुजन समाजातील तरुणांना राजे बँक कर्ज उपलब्ध करून देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शाहू समूह वेळोवेळी अनेक योजना आणि उपक्रम राबवत आहे. त्याचबरोबर मराठा समाजातील तरुणांसाठी कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण मिळावे यासाठी गेले काही दिवस आम्ही प्रयत्न करत आहोत. दलित चेंबर ऑफ कॉमर्स ही संस्था आंबेडकर आणि शाहूंच्या विचारांचा वारसा घेऊन श्री चौहान आणि संस्थापक चेअरमन मा. मिलिंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरित्या कार्य करत आहे. समाजातील दलित वर्गातील सुशिक्षित युवा वर्गाला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे या ध्येयाने त्यांचेही कार्य अविरतपणे सुरू आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी प्रगतिशील आणि विकसित समाजाचे स्वप्न पाहिले होते. शाहू समूहाने आणि डिक्की या दोहोंनी शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे स्वप्न पाहिले आहे. आणि तेच पूर्ण करण्यासाठी आम्ही एकत्र येऊन नक्कीच प्रयत्न करू.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये बहूजन वर्गाच्या विकासासाठी काम करण्याची इच्छा आहे. त्यासाठी लागणारे सर्वोत्तोपरी सहकार्य शाहू गुपच्या वतीने DICCI ला करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.कोल्हापुरात लवकरच मार्गदर्शक मेळावा आयोजीत करण्याचा संकल्प राजेनी बोलून दाखविला.

संस्थापक चेअरमन पद्मश्री मिलींद कांबळे म्हणाले ,राजे समरजीतसिंह घाटगे यांनी DICCI च्या माध्यमातून दलित वर्गातील युवक युवतींना स्वावलंबी आत्मनिर्भर व यशस्वी उद्योजक बनविण्यासाठी सहकार्य करणे ही गोष्ट आमच्या आनंददायी व भूषणावह आहे.
पुन्हा एकदा छ. शाहू महाराजांच्या रक्ताचे आणि विचारांचे वारसदार राजे समरजितसिंह घाटगे आमच्या आंबेडकरी वर्गाशी जुळताहेत ही भाग्याची गोष्ट आहे . छ.शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते दृढ करण्याच मोठे कार्य ते करीत आहेत

राजर्षी छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन
समरजितसिंह घाटगे यांनी केले.स्लाईड शो द्वारे DICCI मार्फत संपूर्ण भारतभर कशाप्रकारे काम चालते या विषयीचा व्हिडीओ यावेळी दाखविण्यात आला.

स्वागत व प्रास्ताविक संतोष कांबळे यांनी केले .
राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री रविकुमार नर्रा, राष्ट्रीय उपाध्यक्ष संजीव डांगी, वेस्ट इंडिया अध्यक्ष अविनाश जगताप, राष्ट्रीय मार्गदर्शिका ( )महिला विभाग श्रीमती सीमा कांबळे, महाराष्ट्र अध्यक्ष आणि समन्वयक ( वेस्टर्न इंडिया ) संतोष कांबळे आणि सतीश कुलकर्णी आदी प्रमुख उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks