ताज्या बातम्यानिधन वार्तामहाराष्ट्र
कोल्हापूर : माजी उपमहापौर सचिन खेडकर यांचे निधन

कोल्हापूर : रोहन भिऊगडे
कोल्हापूर महापालिकेचे माजी उपमहापौर सचिन आनंदराव खेडकर (43) यांचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले. गेल्या पंधरा दिवसा पूर्वी खेडकर यांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला होता. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांचा मृत्यू झाला.
खेडकर कुटुंबीय गेली वीस वर्षे महापालिकेच्या राजकारणात आहेत. त्यांचे वडील आनंदराव खेडकर, आई मालती खेडकर, पत्नी अनुराधा खेडकर या प्रत्येकाने नगरसेवक पद भूषविले आहे. सचिन खेडकर 2010 ते 2015 या काळात नगरसेवक होते. एक वर्ष त्यांना उपमहापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली.सचिन खेडकर यांचे आज कोरोणाने निधन झाल्याने भागात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी,मुले असा परिवार आहे.