ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूडच्या सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात कोल्हापूर विभागीय(पुरुष) हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत, कोल्हापूर विभागीय हॉलीबॉल स्पर्धा (पुरुष) ह्या दिनांक २०, २१ ऑक्टोबर २०२३ रोजी संपन्न होणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष मान. अ‍ॅड. वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते होणार असून, या स्पर्धेकरिता महाविद्यालयीन कोल्हापूर जिल्ह्यातील संघ सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेतून प्रथम येणारे चार संघ अंतर विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरतील. या स्पर्धेच्या नेटक्या नियोजनाची धुरा महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक व हॉलीबॉल स्पर्धा सचिव प्रा. डॉ. शिवाजी पोवार हे सांभाळत आहेत. या स्पर्धेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार हे आहेत.

स्पर्धा यशस्वी पार पडणे कामी संस्थेच्या शिवराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य श्री. महादेव कानकेकर तसेच संभाजी मांगले, श्रावण कळांद्रे, विनोद रणवरे हे देखील अनमोल सहकार्य करत आहेत. स्पर्धा संयोजक सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाने आज पर्यंत कोल्हापूर विभागीय स्पर्धांची तसेच विभागीय व आंतरविभागीय योगा स्पर्धा, कुस्ती स्पर्धा यांचे बऱ्याच वेळा नेटके नियोजन करून यशस्विता संपन्न केलेली आहे .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks