गुन्हातंत्रज्ञानताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावधान : दहा रुपयांचा रिचार्ज मारायला गेले अन् तीन लाख गमवून बसले; लिंक ओपन करणे पडले महागात

सातारा :

हॅलो, तुमचे सिम कार्ड बंद होईल. सुरु ठेवण्यासाठी लिंक पाठवतो, त्यावर दहा रुपयांचा रिचार्ज मारा,’ असे सांगत एका व्यक्तीच्या बॅंक खात्यामधून तब्बल ३ लाख ५ हजार ७०० रुपये गायब केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यात घडलीय.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दत्तात्रय नामदेव निकम (वय ५४, रा.सरदबझार, सातारा) यांना अज्ञाताने फोन करुन तुमच्या सिमकार्डचा रिचार्ज संपेल, त्यासाठी दहा रुपयांचा रिचार्ज मारा, असे सांगून व्हॉट्सअॅपवर लिंक पाठवली. निकम यांनी त्या लिंकवर क्लिक करुन प्रोसिजर केली. मात्र संबंधित कॉल व ती लिंक फसवी असल्याचे निकम यांच्या लक्षात आले नाही. याचा गैरफायदा घेत अज्ञाताने त्या फसव्या लिंकच्या आधारे तक्रारदार यांच्या खात्यातून ३ लाख ५ हजार ७००० रुपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर निकम यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी या प्रकराची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली असून,अज्ञातावर आयटी अ‍ॅक्ट आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks