ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगलीत ऊसतोडी रोखल्या, वाहनांची हवा सोडली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आष्टा, बागणी, मर्दवाडी, दुधगाव परिसरातील ऊसतोडी आज बंद पाडल्या. तसेच ऊसवाहतूक करणाऱया वाहनांची हवा सोडली. आष्टा येथील राजारामबापू कारखान्याच्या कार्यालयाला टाळे ठोकले, तर दत्त इंडियाच्या कसबे डिग्रज कार्यालयाला कुलूप लावले.

उसाला पहिली उचल 3500 रुपये जाहीर करावी, गतवर्षीचे 400 रुपये तातडीने द्यावेत, या मागण्यांसाठी ‘ऊसतोड बंदी’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. तरीही काही शेतकरी ऊसतोड घेत आहेत. त्यांच्या तोडी बंद करण्यात आल्या तसेच ऊसवाहतूक करणाऱया वाहनांची हवा सोडण्यात आली. यावेळी बागणी येथे किरकोळ वादावादी झाली. उसाला पहिली उचल 3500 मिळालीच पाहिजे, दुसरा हप्ता 400 रुपये मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत दुचाकी रॅली काढत ‘ऊसतोड बंद’ आंदोलन करण्यात आले.

‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, शेतकऱयांनी आठवडाभर थांबावे, सर्व कारखाने पोपटासारखे बोलायला लागतील. त्यांना 3500 पहिली उचल द्यावीच लागेल. शेतकरी, वाहनधारक आणि तोडकऱयांनी सहकार्य करावे. वाहनातील हवा सोडताना आमच्या कार्यकर्त्यांच्या जिवावर येते; पण ते नाईलाज म्हणूनच ते कृत्य करतात. यावेळी बाबा सांद्रे, मयूर पाटील, संजय बेले, सौरभ पाटील, दीपक मगदूम, रवींद्र आडमुठे, शीतल सानद्रे, जगन्नाथ भोसले, प्रताप पाटील, पंडित सपकाळ, काशिनाथ निंबाळकर, अरुण कवठेकर, अभिजित पाटील, वैभव पाटील आदी उपस्थित होते.

ईश्वरपूरमध्ये स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी आज सर्वोदय सहकारी साखर (राजारामबापू युनिट क्र. 3) कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक अडवून वाहतूक करणारे ट्रक्टर, बैलगाडय़ा रोखून धरल्या. या वेळी 20 ते 25 बैलगाडय़ा व 5 ट्रक्टरची हवा सोडली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks