क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘बिद्री’ ने मानधनधारक कुस्ती स्पर्धा भरावी यासाठी पैलवानांनी केले एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

बिद्री ता कागल येथील श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने बंद केलेली मानधनधारक कुस्ती स्पर्धा पुन्हा सुरु कराव्यात या मागणीसाठी परिसरातील मल्ल आणि कुस्तीप्रेमी यांच्यावतीने आज बिद्री बसस्थानक येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. कारखान्याचे अध्यक्ष के.पी पाटील , कार्यकारी संचालक के. एस.चौगले यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यांनी याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

लढा लाल मातीच्या हक्कासाठी कुस्ती हेच जिवन यांच्या वतीने पैलवान , वस्ताद,कुस्ती शौकीन यांच्या मार्फत एक दिवस सीय लक्षणीय उपोषण च्या सर्व पैलवान .

बिद्री साखर कारखान्याच्यावतीने दरवर्षी मानधनधारक कुस्ती स्पर्धा भरवल्या जात होत्या. परंतू मागील सात ते आठ वर्षांपासून या स्पर्धा झालेल्या नाहीत. कारखाना कार्यक्षेत्रातील मल्ल व कुस्तीप्रेमींनी याबाबत प्रशासनास विनंती , अर्ज , निवेदने सादर केली होती. परंतू प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने , आज बिद्री बसस्थानक येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. यावेळी विविध वक्त्यांनी कोरोनाच्या महामारीत मल्लांची झालेली आर्थिक कोंडी लक्षात घेऊन बिद्रीने मानधनधारक कुस्ती स्पर्धा भरवाव्यात अशी मागणी विविध वक्त्यांनी आपल्या भाषणात केली.

राधानगरी – भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर , बिद्री कारखान्याचे संचालक प्रविणसिह पाटील,कसबा वाळवेचे माजी सरपंच अशोक फराकटे, यांनी उपोषणस्थळी भेट देत पाठिंबा व्यक्त केला. याप्रसंगी हिंदकेसरी दीनानाथ सिंह , माजी जि.प. सदस्य राहुल देसाई कागलचे सभापती जयदिप पोवार , बिद्रीचे संचालक धोंडीराम मगदूम, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते .

यावेळी आंतरराष्ट्रीय पैलवान सोनबा गोंगाने, उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार, राष्ट्रीय खेळाडू कौतुक डाफळे, समीर देसाई, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे प्रतिनिधी रामदास देसाई,कुलदीप खोत, राजू चव्हाण, पांडुरंग पुजारी, तुकाराम चोपडे, तानाजी गवसे, नामदेव चौगुले, सागर शिंदे सचिन कळके, श्रावण पाटील, , नामदेव चौगले, सागर शिंदे, कुस्ती निवेदक कृष्णात चौगुले, राजाराम चौगले, के. बी. चौगले, स्वागत पाटील, उदय पाटील, प्रकाश पवार , दीपक नार्वेकर, पांडुरंग महाडेश्वर, सखाराम पाटील, कुलदीप खोत,प्रकाश कांबळे आदी पैलवान व कुस्तीप्रेमी नागरिक उपस्थित होते.

” बिद्री साखर कारखान्याने यापुर्वी अनेकदा मानधनधारक कुस्ती स्पर्धा भरवत उदयोन्मुख मल्लांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. मागील काही वर्षांत या स्पर्धा काही कारणांमुळे बंद होत्या. परंतू चालू गळित हंगाम संपल्यावर कार्यक्षेत्रातील मल्ल व प्रशासन यांच्या परस्पर विचारातून लवकरच कुस्ती स्पर्धा भरविण्याचा कारखान्याचा मानस आहे . “

– माजी आ. के.पी. पाटील , अध्यक्ष बिद्री साखर कारखाना .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks