ताज्या बातम्या

मराठा समाजाला आरक्षण मिळावे मागणीसाठी बिद्री येथे दुचाकी रॅली , बाजारपेठ बंद व कँडल मार्च

बिद्री प्रतिनिधी अक्षय घोडके : 

      मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलन तापले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मराठा समाज आक्रमक झाला असून नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटलांना ठिक ठिकाणी पाठिंबा मिळताना दिसत आहे. या साठी सकल मराठा क्रांती मोर्चा मार्फत आज बिद्री येथे सकाळी टू व्हीलर रॅली व रात्री कँडल मार्च काढून राज्य सरकार बद्दल निषेध व्यक्त केला.

 बिद्री व्यापारी असोसियशन तर्फे बिद्री परिसरातील सर्व व्यापारी बंधुनी आपला व्यवसाय बंद ठेऊन सहभाग नोंदवला. 

या मोर्चात बिद्री गावातील संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरला होता या मोर्चाला संबोधित करताना दिगंबर पाटील सर म्हणाले जो पर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत राज्यातील कोणत्याही राजकीय नेत्याला गावात प्रवेश मिळणार नाही. त्यांनी आपल्या जबाबदारीवर गावात प्रवेश करावा असेही त्यांनी सांगितले. तसेच सरकारने जरांगे पाटील यांच्या मुद्द्याप्रमाणे काही मराठा बांधवांना मराठा कुणबी दाखला मिळतो तर काहींना मिळत नाही तर सरसकट मराठा जात प्रमाणपत्र मिळाले आणि सर्व क्षेत्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी केली. यावेळी बिद्री गावातील संपूर्ण सकल मराठा समाज उपस्थित होता.

 

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks