क्रीडाताज्या बातम्या

जागतिक रँकिंग कुस्ती स्पर्धेसाठी स्वाती शिंदेची भारतीय संघात निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगुड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल व जेएसडब्ल्यू ( जिंन्दाल ) ग्रुपची दत्तक कुस्तीगीर कु.स्वाती संजय शिंदे (५३ किलो)हीची बल्गेरिया (युरोप ) येथे दि- १७ ते २० फेब्रुवारी दरम्यान होणा-या “world Ranking wrestling competition” साठी भारतीय कुस्ती संघात निवड निवड झाली .महिला गटात महाराष्ट्राची ती एकमेव कुस्तीगीर आहे .

अयोध्या ( उत्तरप्रदेश ) येथील २४ व्या राष्ट्रीय वरिष्ट गट अजिंक्यपद कुस्ती स्पर्धत येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल व जेएसडब्ल्यू ( जिंन्दाल ) ग्रुपची दत्तक कुस्तीगीर कु.स्वाती संजय शिंदे हीने (५३ किलो)महाराष्ट्राला रौप्यपदक मिळवून दिले . त्यामुळे तिची युरोपमध्ये होणाऱ्या या कुस्ती स्पर्धसाठी भारतीय कुस्ती संघात निवड झाली आहे . त्यामुळे राष्ट्रीय कुस्तीमध्ये मंडलिक साई आखाड्याचा दबदबा निर्माण झाला आहे .

मंडलिक आखाड्याच्या स्वाती शिंदे हिने यापुर्वी तीन आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा सहभागा बरोबरच राष्ट्रीय स्तरावर आठ सुवर्णपदके, सात रौप्यपदके तसेच अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावरही पदकांचा रतीब टाकला आहे. महापौर केसरीपदाचा मानही अनेकदा मिळविला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळविण्यासाठी कोच दादासो लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती शिंदे कसून सराव करीत आहे .

तिला आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक एनआयएस कोच दादासो लवटे, वस्ताद,माजी नगराध्यक्ष सुखदेव येरूडकर, दयानंद खतकर, सागर देसाई यांचे मार्गदर्शन तर खासदार संजयदादा मंडलिक, अॅड . वीरेंद्र मंडलिक, साई राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे, कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालिम संघ,कोल्हापूर यांचे प्रोत्साहन लाभले

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks