ताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक

गारगोटी हायस्कूलच्या वारकरी दिंडीस उत्स्फूर्त प्रतिसाद : रिंगण सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी

दिंडीत विठ्ठल, रखुमाई यासह संतांच्या वेशातील विद्यार्थी रथात बसले होते.

गारगोटी प्रतिनिधी : 

भुदरगड शिक्षण संस्था संचालित गारगोटी हायस्कूल व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त गारगोटी शहरातून वारकरी दिंडी काढली. या दिंडीत विठ्ठल, रखुमाई यासह संतांच्या वेशातील विद्यार्थी रथात बसले होते. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी पारंपारिक वारकरी वेषभूषेत दिंडीत सहभागी झाले होते. दिंडीस पालक वर्गासह समाजातील सर्व घटकाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
  

या दिंडीचा शुभारंभ ह.भ.प. राम कळंबेकर व ह.भ.प.दत्तात्रय घुंगुरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पारंपारिक पध्दतीने सजविलेला रथ, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसह टाळ व मृदूंगाच्या गजरात दिंडी नेण्यात आली. मार्गावर अनेक ठिकाणी महिलांनी दिंडीचे स्वागत व पालखीचे पूजन केले. हुतात्मा क्रांती चौक, महादेव मंदिर चौक व श्री.साई मंदिरासमोर रिंगण सोहळा पार पडला. रिंगण सोहळा पाहण्यासाठी महिलांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांना विठ्ठल भजनी मंडळाच्या वतीने फराळ वाटप करण्यात आला.
    

यावेळी मुख्याध्यापक मिलिंद पांगिरेकर, विभागप्रमुख आर.पी.गव्हाणकर, आर.वाय.देसाई, श्री.आर. डी. पोवार, एच. आर. शिंदे, प्रा.शेखर देसाई, डी.जी.लकमले, जी डी. ठाकूर, व्ही. एम. पाटील, एस. एस. नाईक, डी.एस.ससे, एस.एम.साळवी, श्रीमती एन. एम चांदके, श्रीमती आर. आर. बहादुरे, सौ. एल.आर.पाळेकर, प्रा.सौ.तृप्ती पाटील, प्रा.सौ. रोहिणी निकम, प्रा.सौ.स्नेहा साळोखे, विनायक नाईक, सौ.शुभांगी भाट, श्रीमती मेघा चव्हाण पाटील, अमृत देसाई, विजय स्मार्त, नामदेव शिंदे, बाळासाहेब मिसाळ, रघुनाथ पाटील, सौ. मंगल कांबळे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks