आरोग्यताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक

भुदरगड प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरास ८१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गारगोटी प्रतिनिधी : समीर मकानदार

सामाजिक भान जपत भुदरगड प्रतिष्ठान दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतं. या वर्षीच्या शिबिराचा संकल्प पुष्पनगर ता.भुदरगड येथे घेत तो 81 रक्तदात्यानिशी यशस्वीपणे पूर्ण केला. दरवर्षी घेत असलेल्या या शिबिराचे यावर्षीचं आयोजन पुष्पनगर येथील केदारलिंग मंदिरात करण्यात आलं होतं.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष दयानंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या या शिबिरासाठी जीवनधारा रक्तपेढी कोल्हापूर चे प्रमुख प्रसाद बिंदगे यांनी आपल्या टीमसोबत रक्तसंकलन केले.

कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते फित कापून व श्रीफळ वाढवून झाले. यावेळी प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष अशोक गुरव, सल्लागार योगेश भोईटे, चिटणीस देवदत्त शिंदे, गारगोटी शहराध्यक्ष देव दबडे, मार्गदर्शक आणि आधारस्तंभ राजेंद्र दबडे सरपंच आर.बी.देसाई, बाळ जाधव, संग्राम शिंदे, अशोक देसाई, राजेंद्र देसाई आदी उपस्थित होते.

शेताची ऐन रोपलावणीची कामे असताना सुद्धा लोकांचा उत्तम प्रतिसाद यावेळी लाभला. रक्तदाता म्हणून युवावर्गाचा उत्कृष्ट सहभाग मिळाला. पावसाची वाढती रिपरिप असताना देखील गोकुळ नूतन संचालक रणजितसिंह पाटील, माजी जिल्हापरिषद सदस्य राहुलदादा देसाई, बिद्री कारखाना संचालक मधू आप्पा देसाई, कोजीमाशी चे संचालक एच.आर पाटील, संतोष मेंगाने, जयराज देसाई, सामाजिक कार्यकर्ते समीर म्हाब्री, शशिकांत पाटील, वैभव पाटील, अजित दादा देसाई, संपत देसाई, सचिन देसाई, काँग्रेस महासचिव शंभूराजे देसाई, सुशांत माळवी, धनंजय कुरळे, यांच्या शुभेच्छा भेटीही यावेळी शिबीरासाठी लाभल्या.

आजवर प्रतिष्ठान ने 4 यशस्वी रक्तदान शिबीर घेतली आहेत आणि त्यामध्ये लोकांनी उत्तम प्रतिसादही दिला आहे या शिबीरासाठीही 81 रक्तदात्यांचा प्रतिसाद मिळाला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठानचा लोगो असलेलं आकर्षक घड्याळ भेटवस्तू म्हणून देण्यात आले. कार्यक्रमाच नियोजन करण्यासाठी क्रीडा शिक्षक सचिन चौगले, प्रतिष्ठानचे प्रवक्ते पत्रकार समीर मकानदार, अजिंक्य देसाई, शिवज्ञा गडसवर्धन परिवाराचे अध्यक्ष संदीप देसाई, अवधूत सुतार, प्रवीण देसाई यांनी पुढाकार घेतला तर अजित कदम, प्रवीण भोईटे, विशाल भोईटे, प्रवक्ते पंकज तोडकर, सुरेंद्र देशपांडे या व्यक्तींचं मोलाचं सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks