ताज्या बातम्याभारत

सर्व देवतांमध्ये एकच आत्मचैतन्य : परमात्मराज महाराज; सद्भक्त दिपक कदम यांचेकडून श्री दत्तगुरु चरणी रौप्यपादुका अर्पण

कोगनोळी :

कोणत्याही देवतेची भक्ती केल्यास ती मधुरतेकडेच नेणारी आहे. दैवतांच्या सर्व रूपांमध्ये एकच एक आत्मचैतन्य आहे. असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. ते संजीवनगिरी वरील श्रीदत्त देवस्थान मठात वेदिकासंस्थित पादुकांच्या महापूजेच्या निमित्ताने आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी श्री दत्तगुरुंच्या नूतन रौप्यवेदिका संस्थित रौप्य पादुकांना अभिषेक अर्पण करण्यात आला. सद्भक्त दिपक कदम यांच्या हस्ते सपत्नीक पादुकांची महापूजा करण्यात आली. त्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी प्रथमतः परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या हस्ते चरणपादुका पूजेसाठी संस्थापित करण्यात आल्या. अविनाश त्र्यंबक जोशी व पुराणिक यांनी पौरोहित्य केले.

यावेळी बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज पुढे म्हणाले, नवविधा भक्तीमध्ये श्रवण, अर्चन, नामस्मरण, पादसेवन, आत्मनिवेदन इत्यादी प्रकार सांगितले आहेत. या वेगवेगळ्या प्रकारांव्दारे भक्ती केली तरी भक्तीची एकच मधुरता प्राप्त होते. चरण पूजेचे अनन्य साधारण महत्व आहे. विष्णू पूजेवेळी शाळिग्राम, महेशाची पूजा करताना लिंगपूजा केली जाते. तद्वतच दतगुरूंची पूजा चरणकमल चिन्हांच्या रूपात करण्याची वहिवाट आहे. चरणसेवारूप भक्ती विनम्रता निर्माण करते. अभिमानाने माणूस जड बनतो. म्हणून चरण चिह्नांची पूजा करण्याची वहिवाट आहे.

यावेळी रौप्यवेदिका संस्थित रौप्यपादुकांचे देणगीदार श्री. दिपक कदम व सौ. दिपाली दि. कदम यांचा तसेच अविनाश जोशी, पुराणिक व विकास जोशी यांचा प.पू. परमात्मराज महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी असंख्य भाविकांनी महापूजा व महाप्रसादाचा लाभ घेतला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks