ताज्या बातम्या

मुरगूड पोलीस स्टेशन हद्दीतील नदी व ओढ्या लगतच्या सर्व गावकऱ्यांना सूचना

मुसळधार पावसामुळे नदी ओढे ओसंडून वाहत आहेत. पूलांवर पाणी आले आहे.
⭕ पुल सांडव्यावर पाणी आल्यामुळे अशा पाण्यातून धोकादायक पद्धतीने वाहने चालवू नयेत.
⭕ नदीला ओढ्याला आलेला पूर पाहण्यासाठी स्वतः जावू नये व मुलाबाळांना देखील नेवू नये.
⭕ नदीपात्रालगत राहणाऱ्या लोकांनी वेळीच ग्रामपंचायत अथवा महसूल प्रशासनाने केलेल्या निवाऱ्याच्या ठिकाणी जावे.
⭕ वीज कोसळणे झाडे पडणे वीज तारा तुटून पडणे अशामुळे जीवित हानी होऊ शकते त्यामुळे अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये.
⭕ घरातील लहान मुलांवर लक्ष ठेवावे ती पाणी भरलेले ठिकाणी पाणी वाहत असलेले ठिकाणे जाणार नाहीत याची काळजी पालकांनी घ्यावी.
⭕ ज्या ज्या नदी ओढ्यां वरील पुलांवर पाणी आले आहे अशा ठिकाणी बॅरीगेटिंग करण्यात आलेले आहे ती धोकादायक पातळी असल्याने बॅरीगेटिंग ओलांडून पुढे जाऊ नये.
⭕ आपत्तिजनक परिस्थितीमध्ये, स्थानिक ग्रामपंचायत, ग्रामसेवक, तलाठी, आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाईन क्रमांक 1077 अथवा मुरगूड पोलीस स्टेशन क्रमांक +912325264333 या वर संपर्क साधावा.
सहा पोलीस निरीक्षक,
मुरगूड पोलीस स्टेशन

हे पण वाचा :

कोल्हापूर पुन्हा लॉकडाऊन होणार!; केंद्रीय समितीने कोरोना प्रसारामुळे व्यक्त केली चिंता.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks