ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागल :;राजर्षी शाहू लोकरंग महोत्सवास गुरुवारी(ता.२)प्रारंभ ; लोकप्रिय कीर्तनकार ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या कीर्तनाचे महोत्सवाची सुरवात

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कागल येथे राजर्षी शाहू लोकरंग महोत्सवास गुरुवार (ता.२)पासून प्रारभ होणार आहे.सायंकाळी सहा वाजता नामवंत कीर्तनकार ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील( बुलढाणा) यांच्या सुश्राव्य कीर्तन सोहळ्याने या महोत्सवास प्रारंभ होणार आहे.तत्पुर्वी सायंकाळी चार वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या महोत्सवाचा शुभारंभ सोहळा होईल. तर साडेपाच वाजता दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे.

शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी जयंती निमित्त राजे विक्रमसिंह घाटगे फांउडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती कागल यांच्या संयुक्त विदयमाने दि.2 नोव्हेंबर ते दि. 5 नोव्हेंबर 2023 अखेर कागल शहरात प्रथमच शिक्षण संकुल कागलच्या पटांगणावर या महोत्सवाचे आयोजन केले आहे.शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे, विरेंद्राराजे घाटगे,सौ श्रेया घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

लोकराजा राजर्षि शाहू महाराज यांचे आदर्श व समाजभिमुख विचार आणी स्व, राजे विक्रमसिंह घाटगे यांचे लोकहिताचे कार्य नवीन पिढीसमोर यावेत या हेतूने व स्थानिक कलाकाराना व्यक्तीना प्रोत्साहन देणेच्या दृष्टीने भव्य कृषी प्रदर्शनासह चार दिवस विविध सांस्कृतिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले आहे.

शुक्रवारी तारीख 3 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता नृत्य नाट्य गायन संगीत व विविध कला गुणदर्शन या टॅलेंट हंट कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तर सायंकाळी चार वाजता मोरया पुरस्कार वितरण होईल. यावेळी भरतनाट्यम टॅलेंट हंट स्पर्धेतील विजेत्यांचा स्पेशल प्रोग्रॅम नेत्रदीपक सजीव देखावा व धनगरी ढोलांचे सादरीकरणही होणार आहे.

शनिवारी चार नोव्हेंबर रोजी तीन लाख रुपये बक्षीसाच्या भव्य झिम्मा फुगडी स्पर्धा होतील.स्पर्धेआधी सकाळी नऊ वाजता विशेष चित्रपटाचे आयोजन केले आहे.

रविवारी 5 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ होईल. तर सायंकाळी सहा वाजता लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्काराचे समाजसेवक डाॕ.प्रकाश आमटे यांना वितरण होईल.त्यानंतर ताल उत्सव हा कार्यक्रम होईल

चारही दिवस भव्य कृषी प्रदर्शन, विविध स्टॉल, मनपंसद खरेदी,महिला बचत गटासाठी विक्री स्टाॕल,बारा बलुतेदार यांच्या माध्यमातून ग्राम संस्कृतीचे दर्शन, चटकदार खादय जत्रा, बालचमुसाठी फणी गेमचेही आयोजन केले आहे.
“लई भारी कागल कलाकारी”अशी टॕगलाईन असलेल्या या महोत्सव अंतर्गत राजर्षींच्या विचाराचा लोकजागर होईल. हे सर्व कार्यक्रम श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुल मैदान कागल मुरगुड रोड कागल या प्रशालेच्या प्रांगणात होणार आहेत.

टिव्ही सिरियलमधील कलाकारांच्या उपस्थितीचे आकर्षण

या कार्यक्रमाच्या निमित्ताने रविवारी पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सोनी मराठी या आघाडीच्या वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमधील विविध कलाकारांना भेटण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. यामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर ओंकार राऊत खुमासदार नात्यांचा गोड मसाला फेम महिमा म्हात्रे व शर्वांनी पिल्लई यांचा समावेश आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks