ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूड येथे बकरी ईदची कुर्बानी आषाढीच्या दुस-या दिवशी ; मुरगूड मधील मुस्लिम समाजाचा निर्णय

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

हिंदू धर्मियांच्या जिव्हाळ्याचा सण आषाढी एकादशी व मुस्लिम धर्मीयांचा बकरी ईद एकाच दिवशी गुरुवार दिनांक 29 जून रोजी आल्यामुळे ईदची कुर्बानी आषाढीच्या दुस-या दिवशी शुक्रवार दिनांक 30 रोजी करण्याचा निर्णय मुरगूड मधील सुन्नत मुस्लिम जमाअतने घेतला आहे. मुरगुड (ता.कागल) येथील सुन्नत मुस्लिम जमाअतच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुरगूडचे माजी नगराध्यक्ष, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेखान जमादार होते.आषाढीच्या पवित्रदिनी ईदची कुर्बानी केली जाणार नाही. त्या ऐवजी कुर्बानी शुक्रवार (दि.30) करण्यात येणार आहे.

सामाजिक सलोखा आणि सौहार्द परंपरा असणाऱ्या मुरगूड शहर व परिसरात सर्वच सण उत्साहात साजरे होवून सामाजिक सलोखा राहावा हा उद्देश असल्याचे मत अनेकांनी बैठकीत व्यक्त केले.

यावेळी राजेखान जमादार, हाजी.बाळासाहेब मकानदार,राजु मुजावर,दगडु आत्तार, बाबासो नदाफ,बशीर नदाफ(माजी सैनिक) जावेद शिकलगार, अल्लाबक्ष शिकलगार ,दिलावर शिकलगार, आसीफखान जमादार,सोहेल नदाफ, माणिकखान जमादार यांच्यासह सुन्नत मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते,नागरिक उपस्थित होते.आभार सचीव राजु मुजावर यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks