ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुपारी घेऊन पत्रकारावर गोळीबार, पोलिसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या ; 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे शहरातील एका दैनिकाच्या उपनगर वार्ताहरावर गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महर्षीनगर येथे घडली होती. ही घटना रविवारी (दि.11) रात्री नऊच्या सुमारास घडली होती. स्वारगेट पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना गजाआड केलं आहे. चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आर्थिक व्यवहरातून सुपारी घेऊन हा गुन्हा केल्याचे प्राथमदर्शनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे.

प्रथमेश उर्फ शंभु धनंजय तोंडे (वय-20 रा. राजेंद्रनगर, दत्तवाडी, पुणे), अभिषेक शिवाजी रोकडे (वय-22 रा. नांदेड गाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांच्या इतर चार अल्पवयीन साथिदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून 1 गावठी पिस्टल , 1 जिवंत काडतूस , 3 कोयते, गुन्ह्यात वापरलेल्या 4 दुचाकी, 3 मोबाईल असा एकूण 2 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

फिर्य़ादी हे 27 मे रोजी रात्री सातच्या सुमारास दुचाकीवर घरी जात होते. त्यावेळी दोन दुचाकीवरुन आलेल्या पाच अज्ञात आरोपींनी त्यांच्या दुचाकीला गाडी आडवी लावुन त्यांच्या अंगावर मिरची पावडर टेकून कोयता घेऊन अंगावर धाऊन गेले. त्यावेळी फिर्यादी जीव वाचवण्यासाठी तेथून पळून गेले. यानंतर रविवारी (दि.11) रात्री नऊच्या सुमारास घराजवळ आले असता दोन मोपेड वरुन आलेल्या पाच जणांनी त्यांचा पाठलाग करुन पिस्तुलामधून गोळी झाडली. फिर्यादी हे खाली वाकल्यामुळे ते त्यातुन वाचले. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्यातील आरोपींनी तोंडाला रुमाल व मास्क घालुन तसेच तोंड लवपत डोक्यावर टोपी घातली होती. तसेच रात्रीच्या वेळी हल्ला केल्यान सीसीटीव्हीमध्ये (CCTV) दिसून आले मात्र त्यांची ओळख पटली नाही. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल 100 ते 120 सीसीटीव्ही फुटेज तपासले. दरम्यान गुन्ह्यातील आरोपी रांजणगाव येथे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांची दोन पथके तयार करुन एक पथक रांजणगावला रवाना करण्यात आले तर एक पथक धायरी येथे रवाना करण्यात आले. आरोपी पेरणेफाटा लोणीकंद येथे थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी पेरणे फाटा लोणीकंद येथे सापळा रचला असता दोनजण संशयीत रित्या फिरत असल्याचे दिसून आले. आरोपींना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना त्यांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच हा गुन्हा साथीदारांच्या मदतीने केल्याचे सांगितले. तपास पथकाने त्यांच्या साथीदारांचा धायरी, नांदेड गाव भागात शोध घेऊन ताब्यात घेतले. त्याब्यात घेतलेल्या अल्पयीन मुलांकडे चौकशी केली असता त्यांचा या गुन्ह्यात सक्रीय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks