ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडहिंग्लज येथील राष्ट्रीय परिसंवाद निमित्ताने आयोजित पॉवर पॉइंट प्रझेंटेशन स्पर्धेत मंडलिक महाविद्यालयाचा पृथ्वीराज पाटील प्रथम

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड हे नेहमी आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करित असते. यासाठी विद्यार्थ्यांना विविध व्यासपीठे उपलब्ध करुन देत असते. मंगळवार दि. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी डॉ. घाळी कॉलेज गडहिंग्लज यांच्यावतीने आयोजित केलेल्या रोल ऑफ ए आय इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी या एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद अंतर्गत पोस्टर प्रदर्शन व पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

सदर स्पर्धेमध्ये दोनशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड च्या वतीने एनसीसी ‌द्वितीय वर्षात शिकणारा कॅडेट पृथ्वीराज दीपक पाटील याने ‘द ट्रान्सफॉर्मेटिव्ह रोल ऑफ ए आय इन सायन्स, टेक्नॉलॉजी अँड एज्युकेशन’ या विषयावर पावर-पॉइंट प्रेझेंटेशन करुन सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.

यासाठी पृथ्वीराज याला महाविद्यालयाचे एन् सी सी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार प्रधान व पर्यावरण शास्त्राचे प्रा. दयानंद कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. पृथ्वीराज दीपक पाटील याच्या यशाबद्दल मुरगूड परिसरात त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks